Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै ०४, २०२३

नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने? बैठकीत झाला हा निर्णय! Nationalist Congress Party




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश स्तरावर दिनांक 2 जुलैपासून ज्या घटना घडत आहेत. त्यामुळे पक्ष दोन भागात विभागल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर आहे. अशावेळी नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नेमकी कोणाकडे जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना आज महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीनुसार नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपला गट जाहीर केला आहे.

जेव्हा पक्ष अडचणीत आहे तेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नेतृत्वावर ही सभा पूर्णपणे विश्वास व्यक्त करण्यात आला. व यापुढेही त्यांचे नेतृत्वाखाली तसेच प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील साहेब व माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब तथा माजी मंत्री रमेश चंद्र बंग साहेब यांच्या सूचनेनुसार नागपूर शहर कार्यकारणी यापुढेही कार्य करेल या प्रस्तावात ही सभा एकत्रताने आणि मंजूरी प्रदान करण्यात आली.



राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नागपूर शहर कार्यकारिणीची आज मंगळवार दिनांक 4 जुलै 23 रोजी सकाळी 11.30 वाजता गणेश पेठ येथील पक्ष कार्यालयात सभा झाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष श्री दुनेश्वर पेठे आहेत. या सभेला प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील, प्रदेश सरचिटणीस शेखर सवारबांधे, प्रदेश सरचिटणीस रमन ठक्कर सेवादल प्रदेश अध्यक्ष जावा मस्के, वर्षा शामकुळे प्रामुख्याने उपस्थित होते.



मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष


मुंबई दि. ४ जुलै - आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' आहे असा टोला लगावतानाच त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.


आज प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पक्षाची भूमिका जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.


त्यांनी केलेल्या कृतीचे समर्थन वेगवेगळ्या प्रकारे करणे त्यांना गरजेचे आहे. त्यांनी ते करत रहावे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे सर्वांना माहित आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.


शिंदेचे बरेच आमदार नाराज आहेत. यांच्यामुळे आम्ही उध्दव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडली तीच कारणे परत आमच्या पुढयात आणून ठेवत आहात याबद्दल प्रचंड असंतोष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांचा आहे असे मला समजले असल्याचे सांगतानाच ज्यांच्या जिल्हयात विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे असंतोष हळूहळू पुढे येईल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.


शरद पवारसाहेब आमच्याचबरोबर आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सातारा - कराड येथे स्पष्ट केली आहे. ती महाराष्ट्राला समजली आहे हे स्वयंस्पष्ट आहे असेही जयंत पाटील म्हणाले.


थोड्याच दिवसात नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर व इतर काही जिल्हयात पवारसाहेब स्वतः दौरा सुरू करणार आहेत हा झंझावात नाशिक जिल्हयातून सुरु होईल त्याअगोदर दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली की हा महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. पवारसाहेबांच्यावर विश्वास ठेवून मतदान केले तिथल्या मतदाराला त्यावेळी लक्षात येईल असे सांगतानाच हा दौरा लवकरच जाहीर करणार आहोत. पाऊस असो अथवा नसो पवारसाहेब बाहेर पडणार आहेत. सातारच्या दौऱ्यावर जसे स्वागत झाले त्याचपध्दतीने महाराष्ट्रात स्वागत जनता व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.



कुणी काही म्हणो मीच शरद पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. पवारसाहेब जोपर्यंत म्हणत नाही बाजूला हो तोपर्यंत बाजूला करण्याचा कुणाला अधिकार नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.


५३ आमदार आमच्याकडे आहेत त्यापैकी ९ जणांवर आम्ही कारवाई केली आहे. त्यामुळे ५३ वजा ९ हे जे आहे ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना वेगळ्या गटात टाकू नये,त्यांना वेगळी प्रलोभने दाखवू नये, त्यांच्यावर दबाव टाकू नये, सगळ्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करु द्यावे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

#MaharashtraPolitics
#MaharashtraGovernment
#MaharashtraElections
#MaharashtraPoliticalScene
#MaharashtraPoliticalParties
#MaharashtraLeadership
#MaharashtraPoliticalDevelopments
#MaharashtraPoliticalPowerplay
#MaharashtraPoliticalDynamics
#MaharashtraPoliticalScenario

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.