चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात जूनासुरला येथे अनधिकृत साठवून ठेवलेल्या खतावर कृषीविभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत 346 गोण्या खत जप्त करण्यात आल्या. जेके फर्टीलायझर आनंद गुजरात या कारखान्याद्वारे निर्मित भूमीरस ऑरगॅनिक फर्टीलायझर च्या 346 गोण्या खत जप्त करण्यात आल्या आहेत.
राजुरा तालुक्यातील पंचाळा येथील रहिवासी अमोल प्रल्हाद मडावी (वय 30) याने सदर खत जूनासुरला येथील वासुदेव समर्थ यांच्या घरी साठवणूक करून शेतकऱ्यास विक्री करत असताना पकडण्यात आले.
संशयित खताचा साठा अनाधिकृत जागेत ठेवणे, नोंदणी प्रमाणपत्र न घेता खताची विक्री करणे, मोठ्या प्रमाणात खताची विक्री शेतकऱ्यास करणे, खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करणे, या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला
सदर मोहीम विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी किशोर चौधरी, कृषी अधिकारी सुनील काराडवार, गटविकास अधिकारी देव घुणावत, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, मोहीम अधिकारी लकेश कटरे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्रावण बोडे यांनी कार्यवाही केली.
सदर मोहिमेत सुमित परतेकी, पोलीस निरीक्षक मुल व चमू, विनोद निमगडे कृषी सहाय्यक, आणि पंजाबराव राठोड कृषी पर्यवेक्षक मुल यांनी मोलाची कामगिरी बजावली.