पाच राज्यांतील 28.4% नवनिर्वाचित आमदार 'कू'शी जोडून घेत मतदारांशी संपर्क साधत आहेत
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांदरम्यान, गेल्या दोन महिन्यांत, हिंदी आणि पंजाबी भाषेतील बहुभाषिक 'कू'ज् 442% ने वाढले.
योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, अपर्णा यादव, भगवंत मान, चरणजीत सिंह चन्नी हे यूपी आणि पंजाबमधून सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार होते.
राष्ट्रीय, 23 मार्च, 2022: 'कू' ॲपने प्रथमच गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित माहिती प्रसिद्ध केली आहे. हा डेटा अशा भारतीयांच्या भावना व्यक्त करतो ज्यांना प्रथमच कम्युनिटी तयार करण्याची आणि त्यांच्या मातृभाषांचा वापर मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर करण्याची संधी मिळाली. व्हर्च्युअल रॅली आणि ई-मोहिमांद्वारे निवडणूक प्रचार डिजिटल होतो आहे. अशा वेळी Koo ॲप 10 विविध प्रादेशिक भाषांमधली ऑनलाईन अभिव्यक्ती सक्षम करते. 'कू'वर राजकीय उमेदवारांनी स्थानिक भाषांमध्ये त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला.
डेटावरून असे दिसून आले आहे, की पाच राज्यांतील 690 नवनिर्वाचित आमदारांपैकी सुमारे 28.4 टक्के किंवा 196 उमेदवार निवडणुकीच्या काळात मंचावर उपस्थित होते. त्यांनी मतदारांशी ई-कनेक्ट करण्यासह अपडेट्स शेअर करण्यासाठी तसेच सर्व रिअल-टाइम आधारावर आणि फीडबॅक प्राप्त करण्यासाठी 'कू'च्या बहुभाषिक वैशिष्ट्यांचा सक्रियपणे उपयोग केला. 'कू'चा सर्वसमावेशक दृष्टीकोन भारतीयांना त्यांच्या आवडीच्या भाषेत व्यक्त होण्यास सक्षम बनवतो. निवडणूक अपडेट्ससाठी समर्पित टॅब, चॅट रूम्स आणि लाइव्ह वैशिष्ट्य यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांची उमेदवारांना मदत झाली. त्यांनी ऑनलाइन आपली ध्येयधोरणं लोकांपर्यंत पोचवली. सोबतच त्यांचा मतदार संघानुसार लोकांशी संपर्क झाला.
'कू'चा प्रभावी उपयोग करणार्या विजयी उमेदवारांचे राज्यवार विभाजन
हा डेटा विशेषत: उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन महत्त्वाच्या राज्यांवर केंद्रित आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी (भाजप), समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी (आप), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) यासारख्या राजकीय पक्षांमधील विजयी उमेदवारांचे विभाजन दिसून येते. ), राष्ट्रीय लोक दल (RLD), शिरोमणी अकाली दल (SAD) आणि इतर, ज्यांनी मतदानापूर्वी मतदारांना आवाहन करण्यासाठी हा मंच आणि त्याची वैशिष्ट्ये वापरली.
उत्तर प्रदेशसाठी पक्षनिहाय विजयी उमेदवार
पंजाबसाठी पक्षनिहाय विजयी उमेदवार
ही आकडेवारी बहु-भाषिक मायक्रो-ब्लॉगिंगचा उद्य आणि विकास कसा होतो आहे यावर प्रकाश टाकते. त्याचबरोबर 'कू' स्थानिक भाषेतील संवादासाठी सर्वात मोठा मंच म्हणून मतदानाच्या हंगामातले महत्वाचे माध्यम ठरले. मतदारांशी हिंदी आणि पंजाबीमध्ये संवाद साधण्याव्यतिरिक्त, उमेदवारांनी उस्फुर्तपणे अभिनव बहु-भाषिक (MLK) 'कू' फीचर्सचा वापर केला. हे फीचर - युजरला प्लॅटफॉर्मवरील अनेक भाषांमधील संदेशांचे रिअल-टाइम भाषांतर करण्यास सक्षम बनवते. 10 जानेवारी ते 10 मार्च, 2022 या कालावधीत या फीचरचा वापर मागील दोन महिन्यांच्या तुलनेत तब्बल 442 टक्क्यांनी वाढला. उमेदवारांनी सर्वच प्रचार क्षेत्रांमध्ये MLK या फीचरचा वापर केला.
'कू'च्या प्रवक्त्याने सांगितले, “कू' ने सर्व राजकीय पक्षांतील उमेदवारांना भारतीय भाषांच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास सक्षम बनवले आहे. पाच राज्यांतील नवनिर्वाचित आमदारांपैकी एक चतुर्थांशपेक्षा जास्त आमदारांनी त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यास आमच्या मंचाचा उपयोग केला आहे. MLK वैशिष्ट्याचा वापर आमच्या याच विश्वासाला दृढ करते, की बहुभाषिक भारताला स्वतःला व्यक्त करण्यास बहुभाषिक व्यासपीठाची आवश्यकता आहे. एक पारदर्शक, निःपक्षपाती आणि तटस्थ ॲप म्हणून, 'कू'ने उमेदवार आणि मतदार यांच्यातील संभाषण आणि प्रतिबद्धता सक्षम केली. सोबतच त्यांची जागरूकता वाढवली. मतदारांना योग्य निर्णय घेण्यासाठी संवेदनशील बनवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, 'कू' हे बनावट खाती आणि बॉट्सनी तयार केलेल्या विकृतीपासून दूर, लोकांच्या भावनांचे अस्सल प्रतिबिंब आहे. 95 टक्क्यांहून अधिक 'कू' युजर्सनी त्यांचे खाते मोबाइल नंबर वापरून उघडले आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर बॉट्सची उपस्थिती मर्यादित आहे. परिणामी हा डेटा हेच सांगतो, की भारतीयांना त्यांचे विचार आणि मतं मूळ भाषेत मांडता यावीत यासाठी 'कू' चा मंच आदर्श आहे.”
निवडणुकीदरम्यान, 'कू'वरील चर्चांमधून प्रामुख्याने यूपी आणि पंजाबमधील मतदारांची प्रगल्भता दिसून येते. यूपीचे मतदार मोठ्या प्रमाणात योगी आदित्यनाथ यांच्या विद्यमान भाजप सरकारला पुन्हा निवडून देण्याच्या चर्चांमध्ये गुंतले असताना; संवादांमध्ये योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, स्वामी प्रसाद मौर्य, राहुल गांधी आणि अपर्णा यादव यांसारख्या प्रमुख नेत्यांचे उल्लेख होते. दरम्यान, पंजाबमधील 'कू' वापरकर्त्यांमध्ये, सरकारमधील बदलांबाबत युजर्सनी संभाषण केल्याने, सत्ताविरोधी घटक जास्त गाजला. पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भगवंत मान, माजी मुख्यमंत्री चरणसिंग चन्नी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांसारख्या नेत्यांबद्दल राज्यातील 'कू' युजर्सनी सविस्तर चर्चा केली.
'Koo' brings to the fore the data of usage practices during the first assembly elections on the stage