Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १७, २०२३

क्ष-किरणशास्त्र विभागात निरोपासह स्वागत समारंभ | Welcome ceremony with farewell in X-radiology department




*छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील क्ष किरणशास्त्र विभागातील सेमिनार हाल मध्ये निरोपासह स्वागत समारंभाचे 3 आगस्ट 2023 ला विभाग प्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.*

*क्ष-किरणशास्त्र विभागातील सी. टी. स्कॅन तंत्रज्ञ उत्तम केंद्रे यांची ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे प्रशासकीय बदली झाली असून त्यांचे जागेवर अनिरुद्ध चव्हाण येथे रुजू झाले आहेत. करिता निरोपासह स्वागत समारंभाचे बी. बी. मेश्राम यांच्या विशेष प्रयत्नाने, सर्वांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते.*

*प्रमुख तंत्रज्ञ बी. बी. मेश्राम याप्रसंगी बोलताना म्हणाले की, आपणास दुर्गुणांचा भागाकार करता नाही आला तरी किमान वजाबाकी करून दूर्लक्ष करुया आणि संबंधितांच्या सद्गुणावर लक्ष केंद्रित करून गुणाकार जरी करता आला नाही तरी किमान बेरीज तरी करुया. याप्रसंगी सत्कार मूर्तींना डॉ रविंद्र श्रावस्ती लिखित आदिम दु:खाचे मुक्ती स्थानक 'हॉस्पिटल', भारताचे संविधान, वनस्पती रोपटे, शाल देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामागील भूमिका अशी आहे की, आपण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहोत या अनुषंगाने डाॅ रविंद्र श्रावस्ती यांनी हाॅस्पिटलच्या अनुषंगाने या पुस्तकात छान मांडणी केली आहे. ते वाचून चार टक्के गैरसमज कमी झाले तरी फार असेल तसेच संपूर्ण देश भारतीय संविधानानुसार चालत असताना 94 टक्के जनतेनी ते वाचलेलेच नाही तर मग कसे व्हायचे? याची प्रासंगिकता लक्षात घेऊन ते कृतीत आणले आहे. तसेच पुतले को माला और विचारों को ताला याला फाटा देत वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.*

*अध्यक्षीय समारोप करताना विभाग प्रमुख डॉ. वर्षा रोटे-कागीनाळकर म्हणाल्या की, आपण सर्व सहका-यांना सोबत घेऊन पुढे चालत राहुया, ज्यामुळे आपल्या विभागाचे कार्य सुरळीतपणे चालू शकेल. तक्रार होऊ नये याची दक्षता बाळगून संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाशी आपण सौजन्याने नीट बोलले पाहिजे.*

*या विभागाची भिस्त ज्यांच्यावर अवलंबून आहे असे विभाग प्रमुख डॉ वर्षा रोटे-कागीनाळकर याचे स्वागत अश्विनी अगवान यांनी केले. तर सहयोगी प्राध्यापक डाॅ. अजय वरे, डॉ. प्रशांत तितरे, डॉ. पंकज आहिरे यांचे स्वागत अनुक्रमे डॉ. राहूल भूते, दिलीप संबेटला, सचिन गायकवाड यांनी केले. सत्कार मूर्ती उत्तम केंद्रे, अनिरुद्ध चव्हाण आणि पदोन्नती झाल्याने अनिल लोणकर, नर्सेस इंचार्ज सुनिता नागरगोजे मिसाल व चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोहमद इर्शाद, अशोक खराटे यांचाही सत्कार विभाग प्रमुख डॉ. रोटे-कागीनाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी सारंग देव पुजारी, सुनील शिंपी, अनिल लोणकर, अनिरुद्ध चव्हाण, उत्तम केंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रतीक पत्की यांनी प्रास्ताविक, डॉ. आभा येळणे यांनी सुत्रसंचालन तर सचिन गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. विभागातील सर्व डाॅक्टर, तंत्रज्ञ, सहायक, नर्सेस, कर्मचारी यांनी सहभागी होऊन सर्वांचा आनंद द्विगुणित केला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.