आता विमानतळ पर्यंतचा प्रवास झाला अधिक सोपा*
· *एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ पर्यंत लवकरच शटल बस सेवा होणार उपलब्ध*
· *सिताबर्डी ते विमानतळ पर्यंत सामाना सह फक्त २० रु. जाणे शक्य*
*नागपूर २९ :* नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून आता एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून विमानतळ पर्यंत जाण्याकरिता लवकरच शटल बसची सुविधा महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका व मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंतराराष्ट्रीय विमानतळ व डॉ. बाबासाहेब आंतराराष्ट्रीय विमानतळ ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर बस ही इलेक्ट्रिक बस असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान ठेवण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यामुळे नागरिकांना सहजपणे विमानतळ पर्यंत पोहचता येईल. सिताबर्डी इंटरचेंज ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंतचे मेट्रोचे तिकीट दर १० रु. असून एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ पर्यंत इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर १० रु. असणार आहे. फक्त २० रु. सिताबर्डी ते विमानतळ पर्यंतचे अंतर गाठता येणार आहे. ही शटल बस सेवा सकाळी ८ वाजता पासून रात्री ८ वाजता पर्यंत नागरिकांन करिता उपलब्ध असेल.स्वच्छ, सुरक्षित,वातानुकूलित,आरामदेय व पर्यावरणपूरक मेट्रोचा व फिडर सर्विसचा उपयोग करून प्रदूषण कमी करण्यास नव्कीच मदत होईल.
या व्यतिरिक्त महा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिकेच्या वतीने शहराच्या इतर ठिकाणाहून तसेच मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचण्याकरिता खाली दिल्याप्रमाणे फिडर बसची व्यवस्था करण्यात आली आहे:
· खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी (एम.आय.डी.सी.गेट)
· खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल
· लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय हॉस्पिटल
· जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते जयताळा
· जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते म्हाळगी नगर
· एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते बेलतरोडी
· जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते बेलतरोडी
तसेच शहरातील इतर भागाना सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनला फिडर बस सर्विसच्या माध्यमाने जोडण्यात आले आहे.
*नॉन मेट्रो परिसर मध्ये सुद्धा मेट्रोची कनेटिव्हिटी :* महा मेट्रोने नॉन मेट्रो परिसर मध्ये सुद्धा मेट्रोची कनेटिव्हिटी वाढविण्याच्या दिशेने पाऊले उचलली असून जास्तीत जास्ती प्रवाश्याना मेट्रोने जोडण्याचा मुख्य मानस आहे. ज्यामध्ये शहरातील इतर भागांना मेट्रो स्टेशनशी फिडर सर्विसच्या माध्यमाने जोडण्यात आले आहे. आता रूट क्र ४ व ७ सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथून पिपळा फाटा, हुडकेश्वर नाका परिसर,राजापेठ, म्हाळगी नगर,न्यू सुभेदार नगर,अयोध्या नगर,रघुजी नगर,हनुमान नगर,मेडिकल चौक,बस स्टेशन, कॉटन मार्केट,धरमपेठ, शंकर नगर,रामनगर,रविनगर,डब्ल्यूसीएल कॉलोनी, सेमिनरी हिल, हजारी पहाड या सर्व मार्गावर प्रवाश्यान करिता सुविधा उपलब्ध असेल. तसेच रूट क्र १९ सिताबर्डी मेट्रो स्टेशन ते न्यू नरसाळा पर्यंत देखील या फिडर सेवा उपल्बध करण्यात आल्या आहे. ज्यामध्ये न्यू नरसाळा, भारत माता नगर, महालक्ष्मी नगर, बिडीपेठ, रघुजी नगर बस स्टॉपचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व उपलब्ध फिडर सेवामुळे जास्तीत जास्ती नागरिकांनी मेट्रो आणि फिडर सर्विसचा उपयोग करून प्रवास करावा असे आवाहन महा मेट्रो तर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.