रेल्वे विभागासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल हे आज चंद्रपूर जिल्हाच्या दौ-यावर असतांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत रेल्वे विभागा संदर्भातील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी माजी नगर सेवक बलराम डोडानी, अजय जयस्वाल यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहर औद्योगिक व पर्यटन क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यानासाठी हे शहर नेहमीच आकर्षण केंद्र राहिले आहे. चंद्रपूर जिल्ह्याला समृद्ध वारसा संस्कृती लाभली आहे, म्हणून या स्थानकांमधून देश विदेशातील बरेच प्रवासी प्रवास करतात. चंद्रपूरमध्ये बांबू, टेराकोटा, जंगल आणि इतर हस्तकलेच्या क्षेत्रात बरेच कलाकार आहेत. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता भारतीय रेल्वे नेहमीच अनन्य कल्पना अवलंबवते. त्याच अंतर्गत अशा कलाकारांना व स्थानिकांना त्यांचा व्यवसाय भरभराटीसाठी व्यासपीठ देत चंद्रपूरच्या कलेची ओळख देश विदेशात पोहचविण्यासाठी येथील रेल्वे स्थानकात हस्तकला कलावंत आणि स्थानिकाकरिता विक्री स्टॉल सुविधा सुरू करण्यात यावी, मालधक्यामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी माल-धक्का शहराच्या बाहेर पडोली रेल्वे स्थानकात हलविण्यात यावा, ट्रॅक-देखभाल करणार्यांना त्वरित वैयक्तिक सुरक्षा साधन ‘रक्षक’ प्रदान करण्यात यावे, . ट्रॅक देखभाल करणार्यांची पदोन्नती करण्यात यावी यासह ईतर मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली असून मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.