Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून २२, २०१९

BRSP चे राजू झोडे काँग्रेसच्या वाटेवर

 नागपूर/ललित लांजेवार:

राजू झोडे चंद्रपूर साठी इमेज परिणाम

आपल्या आंदोलन, मोर्चे,रास्तारोको ने व रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असलेले बिआरएसपीचे माजी विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या चंद्रपुरात सुरू आहे. झोडे हे कॉंग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितल्या जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांचा विजय झाला त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आपली पक्ष सोडून कॉंग्रेसमध्ये येणे पसंद केले, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, स्थायी समितीचे माजी सभापती रामू तिवारी यांनी भाजपमधून वापस कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता, BRSP सोबत असणारे राजू झोडे देखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगु लागली आहे. 

राजू झोडे हे 2007 मध्ये बिएसपीच्या नेतृत्वात बल्लारपूर नगरपरिषद मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते.त्यानंतर मोठी राजकीय उथलापूथल झाल्यानंतर त्यांनी डॉ सुरेश माने यांच्या बिआरएसपी मध्ये प्रवेश केला.व बल्लारपूर नगराध्यक्ष पदाची 2017 मध्ये निवडणूक लढवलीय. मात्र यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. डॉ सुरेश माने यांनी झोडे यांना पक्षाची मोठी जबाबदारी देत त्यांना बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी दिली होती.

ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत कामगार,शेतकरी,शेतमजूर यांच्यासाठी मोर्चे आंदोलन करीत त्यांना न्याय मिळवून दिला. आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चंद्रपुरात सध्या ते चांगलेच चर्चेत असतात.

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या हवेचा पलटलेला रुख बघता ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या चंद्रपुरात सुरू आहे,तसेच ते बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले व मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे बोलल्या जात आहे. 

राजू झोडे यांचा जर काँग्रेसमध्ये प्रवेश झाला, तरी मात्र BRSP चा झोडे यांना अंतर्गत पाठिंबा असणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.