Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, फेब्रुवारी २३, २०१९

दरड कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू

मूल/प्रतिनिधी 
आसोलामेंढा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातील पाणी शेतीला पुरवठा करण्याच्या कामादरम्यान दरड कोसळल्याने मातीत दबुन रवी उईके वय 35 राहणार गोंदीया आणि हरिदास मनोहर दुधबळे वय 42 वर्ष राहणार चिचाळा या दोन मजुरांच्या जागीच मुत्यु झाला तर गजानन मुर्लीधर मेश्राम वय 45 राहणार चिचाळा या मजुराला गंभिर दुखापत झाल्याने त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचाराकरीता भरती करण्यात आले. सदर घटना आज सकाळी दहा वाजता दरम्यान घडली. यावेळी मजुरांनी नुकतेच काम सुरू केले होते.


विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत सावली तालुक्यातील आसोलामेंढा सिंचन प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातील पाणी भुमिगत पाईपलाईनव्दारे चिचाळा आणि लगतच्या सहा गावातील शेतीला पाणीपुरवठा करण्याचे काम पुणे येथील एन.एन.के.कन्स्टक्शन कडे आहे. चिचाळा परीसरात भुमिगत पाईपलाईन टाकल्या जात आहे. या कामात चिचाळा येथील मजुर लावण्यात आले. आज सकाळी जमिनीतील खोदलेल्या दरीत टकण्यात आलेल्या दोन पाईप जोडुन वेल्डींग करीत असतांना अचानकपणे दरड कोसळुन तिथे असलेल्या तिन मजुरांपैकी दोघे मातीचा ढिगार्यात दबल्यामुळे त्यांच्या जागीच मुत्यु झाला एकाला गंभिर दुखापत झाली. सदर घटने मुळे चिचाळा गावात शोककळा पसरली असुन तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीसांनी घटनास्थळ गाठुन सुरक्षेची पाहणी केली. कंत्राटदाराने मजुरांच्या सुरक्षेसंबधाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सदर घटना घडुन दोन मजुरांना आपले जीव गमवावे लागले.आसोलामेंढा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातुन भुमिगत पाईपलाईनव्दारे चिचाळा आणि लगतच्या सहा गावातील शेतीला पाणीपुरवठा करण्याची सुमारे 24 कोटीची ही योजना विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत राबविली जात आहे. 
 
सदर कामावर कंपनीव्दारे 42 मजुर कामावर घेण्यात आले आहे. मजुरांच्या मुत्युचे घटनास्थळ नदी लगतचे असुन याभागातील जमिनीची माती नरम असते हे माहिती असतांनाही याभागातुन पाईप टाकतांना पाईपचा रूंदी एवढेच पोकल्यांडव्दारे नाली खोदण्यात आली आहे. माती नरम असल्याने केल्याजाणार्या कामावरील दोन मजुरांना आपले जीव गमवावे लागले. सदर घटने बाबत कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत राठोड यांचेशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क केला असता सदर घटनेत मुत्यु पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम दिली जाणार असल्याचे तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुध्दा शासनाकडुन मदत देण्यात येणार असल्याचे सांगीतले. कंत्राटदाराच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणार्या विदर्भ पाटबंधारे विभागाचे येथील अभियंता सोनेकर यांनी अत्यंत बेजबाबदार प्रतिक्रीया दिली. 

सदर घटना अपघात असुन त्याबाबत अधिक गांभिर्य दाखविल्या जाऊ नये. मुतकांच्या कुटुंबियांना कंपनी आणि शासनाव्दारे मदत केली जाणार असल्याचे सांगीतले. कंत्राटदाराने मजुरांच्या सुरक्षेसंबधाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सदर घटना घडुन दोन मजुरांना आपले जीव गमवावे लागले.मजुरांच्या मुत्युचे घटनास्थळ नदी लगतचे असुन याभागातील जमिनीची माती नरम असते हे माहिती असतांनाही याभागातुन पाईप टाकतांना पाईपचा रूंदी एवढेच पोकल्यांडव्दारे नाली खोदण्यात आली आहे. माती नरम असल्याने केल्याजाणार्या कामावरील दोन मजुरांना आपले जीव गमवावे लागले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.