नासुप्र व नामप्रविप्रा अंतर्गत अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामाची जबाबदारी
नागपूर - प्रशासकीय कामाचा आवाका आणि कामाची निवड लक्षात घेता नागपूर सुधार प्रन्यास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर शासनाच्या अधीन हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या चारही विभागांतर्गत या बदल्या करण्यात आल्या असून एकूण १२ अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. बदली करण्यात आलेल्या बाराही अधिकाऱ्यांच्या तपशील पुढील प्रमाणे आहे.
१) श्री डी. आर. गोर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांची कार्यकारी अभियंता (मुख्यालय) या विभागातुन कार्यकारी अभियंता (पश्चिम) या विभागात बदली झाली आहे. गोर यांच्याकडे कार्यकारी अभियंता (उत्तर) याचीही अतिरिक्त जवाबदारी देण्यात आली आहे.
२) श्री पी. पी. धनकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांची कार्यकारी अभियंता (पश्चिम), अति कार्यभार कार्यकारी अभियंता तांत्रिक व कार्यकारी अधिकारी या विभागातुन कार्यकारी अभियंता (तांत्रिक) या विभागात बदली झाली आहे. धनकर यांच्याकडे कार्यकारी अभियंता (मुख्यालय) याचीही अतिरिक्त जवाबदारी देण्यात आली आहे.
३) श्री आर. एन. मेघराजानी, सहा. अभियंता-१ (स्थापत्य) यांची सहा. अभियंता, नामप्रविप्रा, अति. कार्यभार कार्यकारी अभियंता, नामप्रविप्रा व कार्यकारी अभियंता (उत्तर) या विभागातुन सहाय्यक अभियंता, नामप्रविप्रा येथे बदली करण्यात आली आहे. मेघराजानी यांच्याकडे कार्यकारी अभियंता, नामप्रविप्रा (इमारत बांधकाम परवानगी पूर्व/पश्चिम/उत्तर/दक्षिण) याचीही अतिरिक्त जवाबदारी देण्यात आली आहे.
४) श्री पी. एम. भांडारकर, सहा. अभियंता-१ (स्थापत्य) यांची सहा. अभियंता (प्रकल्प), आणि कार्यकारी अभियंता (प्रकल्प-२) या विभागातुन सहाय्यक अभियंता (प्रकल्प) याठिकाणी बदली करण्यात आली असून यांच्याकडे कार्यकारी अभियंता, (प्रकल्प-२) व कार्यकारी अभियंता नासुप्र याचीही अतिरिक्त जवाबदारी देण्यात आली आहे.
५) श्री आर. पी. चौरसिया, सहा, अभियंता-१ (स्थापत्य) यांची सहा. अभियंता, नामप्रविप्रा या विभागातुन सहाय्यक अभियंता, नामप्रविप्रा याठिकाणी बदली करण्यात आली आहे. तसेच यांच्याकडे कार्यकारी अभियंता, नामप्रविप्रा (विकास कामे-पूर्व/पश्चिम/उत्तर/दक्षिण) याचीही अतिरिक्त जवाबदारी देण्यात आली आहे.
६) श्री ए. के. अवस्थी, सहा, अभियंता-१ (स्थापत्य) यांची सहा. अभियंता, नामप्रविप्रा (दक्षिण) या विभागातुन सहाय्यक अभियंता, नामप्रविप्रा (दक्षिण) याठिकाणी बदली करण्यात आली आहे. यांच्याकडे सहा. अभियंता, नामप्रविप्रा (पूर्व) याचीही अतिरिक्त जवाबदारी देण्यात आली आहे.
७) श्री बी. पी. मेश्राम, सहा, अभियंता-१ (स्थापत्य) यांची सहा. अभियंता, नामप्रविप्रा, अति, कार्यभार कार्यकारी अभियंता (उत्तर) या विभागातुन सहाय्यक अभियंता, नामप्रविप्रा (उत्तर) याठिकाणी बदली करण्यात आली असून यांच्याकडे सहा. अभियंता, नामप्रविप्रा (पश्चिम) याचीही अतिरिक्त जवाबदारी देण्यात आली आहे.
८) श्री ए. एन. राठोड, सहा, अभियंता-१ (स्थापत्य) यांची विभागीय अधिकारी (उत्तर) या विभागातुन विभागीय अधिकारी (दक्षिण) येथे बदली करण्यात आली आहे.
९) श्री ए. पी. बडगे, सहा, अभियंता-१ (स्थापत्य) यांची विभागीय अधिकारी (दक्षिण) या विभागातुन विभागीय अधिकारी (पश्चिम) येथे बदली करण्यात आली आहे.
१०) श्री पी. डी. आंभोरकर, सहा, अभियंता-१ (स्थापत्य) यांची विभागीय अधिकारी (पश्चिम) या विभागातुन विभागीय अधिकारी (उत्तर) येथे बदली करण्यात आली आहे.
११) श्रीमती जे. एन. झाडे, सहा, अभियंता-२ (स्थापत्य) यांची नामप्रविप्रा (इमारत परवानगी) या विभागातुन सहा, अभियंता-२, नामप्रविप्रा याठिकाणी बदली करण्यात आली असून यांच्याकडे सहाय्यक अभियंता, नामप्रविप्रा (इमारत बांधकाम व विकास परवानगी) याची जवाबदारी देण्यात आली आहे.
१२) श्री ए. व्ही. पाठक, शाखा अभियंता यांची नामप्रविप्रा (इमारत बांधकाम), अतिरिक्त कार्यभार इमारत विभाग (पश्चिम) व सहा, अभियंता (संपत्ती) या विभागातुन नामप्रविप्रा (इमारत परवानगी) येथे बदली करण्यात आली असून यांच्याकडे सहा. अभियंता (संपत्ती) याची जवाबदारी देण्यात आली आहे.