खोटा संदेश पाठवणाऱ्यावर कारवाई होणार
व्हॉट्सअॅपवर कुणी आक्षेपार्ह संदेश पाठवला तर आता दूरसंचार खात्याकडे त्याची तक्रार करता येणार. याबाबतचा आदेश १९ फेब्रुवारीला जारी करण्यात आला.
जर एखाद्याला शिवीगाळ करणारा, धमक्या देणारा किंवा अश्लिल व्हॉट्सअॅप संदेश आला तर त्याची स्क्रीन शॉट घेऊन ही माहिती ई-मेलद्वारे ccaddn-dot@nic.in.या पत्त्यावर पाठवायची.
📞 आक्षेपार्ह संदेशांबाबत तक्रार आल्यावर दूरसंचार सेवा पुरवठादारांनी याबाबत त्यांच्या संबंधित ग्राहकांवर कारवाई करणे अपेक्षित. कारण ग्राहकांनी अर्जात भरून दिलेल्या ग्राहक जाहीरनाम्याचे ते उल्लंघन होते.