चिमूर/रोहित रामटेके
जिजाऊ नागरी सहकारी पत संस्था मर्या. चिमुर र.न. ८१४ च्या तज्ञ संचालक पदी सौ. सपना विशाल गंपावार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिजाऊ पतसंस्थेची मासिक सभा १९ फेब्रुवारीला घेण्यात आली. त्यात प्रथमतः शिवाजी महाराज जयंतीचे अवचित्य साधुन प्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण व पुजन करून शिवाजी महाराज जयंती सोहळा घेण्यात येवून लगेच पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली कार्यकम घेवून शोकसंवेदना व्यक्त केल्या गेल्यात, जिजाऊ पत संस्था नवोदित व प्रवर्तन अवस्थेत असुन संस्थेची वाढ व विकास अपेक्षीत असल्याने सर्व संचालकांनी आपापल्या स्तरावरून संस्था वाढीसाठी निधीत वाढ करून सहकार्य करावे असे अपेक्षीत आहे. संस्थेचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट मार्च २०१९ पर्यत ५० लाख रूपये
ठेवण्यात आलेले असुन संस्था ही स्थनिकांची असल्याने झपाट्याने वाढत असल्याचे
जाणवत आहे असे मत अध्यक्ष सुभाष शेषकर यांनी दिले. निवड झालेल्या सपना
गंपावार यांच्या समाजसेवा कार्यामुळे संस्था निधीत निश्चित वाढ होईल असा विश्वास
संस्थापकांनी दिली. सदरच्या सभेत अध्यक्ष ग्रंथमित्र सुभाष शेषकर समाजसेवक, सचिव रामभाऊ खडसंगे, उपाध्यक्ष अफरोज पठाण, लोण समिती अध्यक्ष प्रा. संजय पिठाडे, डॉ. चंद्रभान खंगार, सुमित भिडेकर, गजानन कारमोरे, मनिष नंदेश्वर, प्रा. राजु कसारे, तज्ञ संचालक डॉ. प्रोर्णिमा खानेकर, व्यवस्थापक रजनी वंजारी, लिपीक मिलींद जांभुळे कर्मचारी स्वप्नील मसराम, नवाज पठाण, रंगनाथ बांगडे, या सर्वांनी संपना गंपावार यांना शुभेच्छा दिल्या आदि मान्यवराच्या उपस्थितीत सभा, शिवाजी महाराज जयंती व शहीदांना श्रध्दाजंली व तज्ञ संचालक नियुक्ती लोन मंजुर अशा विविध उपकम राबविण्यात आलेत.