नागपूर/प्रतिनिधी:
प्रवासी वाहतूक करताना परमिटची गरज असताना व ‘टू व्हीलर टॅक्सीज’ बाबत परिवहन विभागाने राज्यात कुणालाही परवानगी दिली नसताना नागपूर शहरात सुरु असलेल्या ओलाच्या टू व्हीलरटॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने बुधवारी कारवाई करत चार दुचाकी जप्त केल्या.
शहरात ‘ओला’ कंपनीने ‘टू व्हीलर टॅक्सीज’ सुरू केली आहे.या विरोधात विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर शिष्टमंडळासह शहर आरटीओ कार्यालयात तक्रार करताच याला गंभीरतेने घेत आरटीओ शहर कार्यालयाने वायुपथकाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार ‘रॅपिडो अॅप’च्या ‘एमएच३१ बीझेड ४१६२, एमएच३१ डीएच ४३६५, जेके १० यु ३४५०, एमएच ४९ वाय २०६८ व एमएच ३१ बीक्यू ३०८९ या दुचाकींवर अनधिकृत व्यवसाय करीत असल्याची कारवाई करीत वाहने जप्त केली. नंतर ‘अॅप’ बंद पडले.
परंतु आता ‘ओला’ कंपनीने ‘टू व्हीलर टॅक्सीज’ सुरू केली. याची दखल घेत १९ जून रोजी आरटीओच्या वायुपथकाने ‘एमएच ३१ एफके ४७०२’, ‘एमएच ३१ एसी ३४७३’, ‘एमएच ४९ एबी ६६७५’ व ‘एमएच ३१ डीए ५८७५’ ही वाहने जप्त केली.पुढील तीन महिन्यांसाठी या वाहनांची नोंदणीही रद्द केली जाणार आहे.
पोल्ट्रीफीड |