Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १६, २०२३

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के; हे जिल्हे हादरले | Maharashtra: Earthquake


कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता.

Earthquake of Magnitude:3.4, Occurred on 16-08-2023, 06:45:05 IST, Lat: 17.19 & Long: 73.79, Depth: 5 Km, Location: Kolhapur, Maharashtra, India,”

कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (16 ऑगस्ट) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

सतारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. मॉर्निग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


Rain Update 
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस पडला. हवामान भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्य वर्धित अंदाजानुसार विदर्भातील जिल्हयामध्ये पुढील पाच दिवसात १५ ते १९ ऑगस्ट २०२३ रोजी आकाश ढगाळ राहून कमाल तापमान ३०.९ ते ३१.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.४ ते २४.८ अंश सेल्सिअस राहून दिनांक १५ ऑगस्ट रोजी तुरळक/एक किंवा दोन ठिकाणी खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे.










SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.