Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०२, २०२३

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण | shivrajyabhishek sohala 2023

शिवाजी महाराज हे शौर्य आणि मृदूमकीच प्रतीक : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन


रायगडाच्या पायथ्याशी 85 एकर जागेत शिवसृष्टी उभी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यात विविध कार्यक्रमांचा आयोजन




shivrajyabhishek sohala 2023 | छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य आणि मृदूमकीच प्रतीक असून, त्यांनी आपल्यासाठी स्वयंशासनाचा परिपाठ घालून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज यानिमित्ताने प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटला आहे.


"छत्रपती शिवाजी महाराज का राज्याभिषेक साडेतीनशे साल पहले के उस कालखंड का एकाद्भुत और विशिष्ट अध्याय इतिहास रचा. स्वराज सुशासन और समृद्धी की महान गाता है, हमे आज भी प्रेरित करते है"



शिवाजी महाराज आजही आपल्या प्रेरणास्थानी असून ते महान सैनिक तसेच प्रशासक होते त्यांनी गुलामगिरीची मानसिकता संपवली असं प्रधानमंत्री म्हणाले.


शिवाजी महाराजांनी भारताच्या एकता आणि अखंड तिला कार्य सर्वोच्च स्थानी ठेवलं असेही मोदी यांनी सांगितलं. एक भारत श्रेष्ठ भारत या दृष्टीकोनात शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रतिबिंब बहुमत असं मोदी पुढे म्हणाले. भारताची सागरी ताकद ओळखून शिवाजी महाराजांनी आरमाराचा विस्तार केला आणि त्यांची व्यवस्थापन कौशल्य आजही आपल्याला प्रोत्साहन देतात असं त्यांनी सांगितलं.



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (
shivrajyabhishek din 2023) 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळा आज धुळे येथे भाजपाने साजरा केला. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पुतळ्याचे पूजन केलं. सर्व जाती-धर्माच्या 101 जोडप्यांनी सामूहिकपणे शिवरायांच्या पुतळ्यास राज्याभिषेक केला तसेच आग्रा रोडवरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक स्थळी 65 फूट उंच भगवा ध्वज उभारला होता.

रायगडाच्या पायथ्याशी ८५ एकर जागेत शिवसृष्टी उभी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रायगडावर केली छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा होत आहे, त्यानिमित्त आयोजित मुख्य समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. शिवसृष्टीसाठी पन्नास कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. या प्रकल्पासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

प्रतापगड विकास आणि संवर्धन प्राधिकरण स्थापन करण्याची तसेच त्याच्या अध्यक्षपदी उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्याची घोषणा त्यांनी केली. नियोजित सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी राजांचे नाव देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. शिवरायांच्या स्वप्नातला समृद्ध संपन्न महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही यावेळी उपस्थित होते आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आलं.

शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून हजारो शिवप्रेमी रायगडावर जमा झाले आहेत. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचा प्रारंभ काल संध्याकाळी गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची निगडित ऐतिहासिक वस्तूंचा संकलन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

शिव विचारांचा जागर करण्यासाठी राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आज राजस्थानी लोककला उद्या आणि परवा महाराष्ट्राची लोककला तर पाच ते सात जून दरम्यान गोवा आणि गुजरात राज्याच्या लोककलेचे सादरीकरण होणार आहे. 


काय दिवस आले आहेत महाराष्ट्रावर... निवडणुकांसाठी वाट्टेल ते….. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून, 1674 रोजी झाला. इथे मात्र निवडणूकांचे गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख जगामध्ये सगळ्यांना माहित आहे ती 6 जून, 1674 आहे. याचाच अर्थ 350 वा शिवराज्याभिषेक दिन हा 6 जून, 2024 रोजी आहे. मग आज आज शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला. निवडणूकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून जर असे राजकारण होत असेल तर उभ्या महाराष्ट्राची आज शिवराज्याभिषेक साजरा करणा-यांनी माफी मागावी. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि हिंदू धर्मातील ज्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला व तुम्ही शूद्र आहात असे म्हटलं. तेच आज तिथे जाऊन सांगत आहेत की, सनातन धर्माचे पालन करा.

Shivrajyabhishek wikipedia
shivrajyabhishek tithi
shivrajyabhishek in marathi
shivrajyabhishek din date
shivrajyabhishek din 2023
shivrajyabhishek 2 june

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.