Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०२, २०२३

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; २० अधिकाऱ्यांना मिळाले नवे ठिकाण Maharashtra IAS Officer Transfer :


राज्य सरकारने शुक्रवारी (ता. 2 जून) 20 भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्या आहेत. यात IAS अधिकारी तुकाराम मुंढे (

Tukaram Mundhe

) यांची महिन्याभरात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. (
tukaram mundhe current posting
 ) त्यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या महिन्यातच आयएसएस तुकाराम मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. 
tukaram mundhe transfer list
त्यानंतर आता महिन्या भरातच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. (Maharashtra IAS Officer Transfer )

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यावेळी सरकारने 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

कुणाची बदली कुठे?

1. सुजाता सौनिक, आयएएस (1987) मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. एस. व्ही. आर. श्रीनिवास, आयएएस (1991) एमएमआरडीए, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. लोकेश चंद्र, आयएएस (1993) BEST, मुंबई यांची महाडिस्काॅम, मुंबईचे सीएमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. राधिका रस्तोगी, आयएएस (1995) यांची नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. आय ए. कुंदन, आयएएस (1996) महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती दिली आहे.

6. संजीव जयस्वाल, आयएएस (1996) पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सीईओ, म्हाडा, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. आशीष शर्मा, आयएएस (1997) एमसी, बीएमसी मुंबई यांना PS (2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

8. विजय सिंघल, आयएएस (1997) महाडिस्काॅम मुंबई येथून जनरल मॅनेजर BEST, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

9. अंशु सिन्हा, आयएएस (1999) सीईओ, खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. अनुप कृ. यादव, आयएएस (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

11. तुकाराम मुंढे, आयएएस (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. डॉ. अमित सैनी, आयएएस (2007) सीईओ, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13. चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (2008) एमसी, नाशिक एमसी, नाशिक यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. डॉ. माणिक गुरसाल, आयएएस (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची मरीटाईम बोर्ड ( Maritime Board) सीइओ मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15. कादंबरी बलकवडे, आयएएस (2010) कोल्हापूर यांची, मेडा पुणे येथे डिजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16. प्रदिपकुमार डांगे, आयएएस (2011) जाईंट सेक्रेटरी मिशन डायरेक्टर SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.

17. शंतनू गोयल, आयएएस (2012) आयुक्त, (MGNREGS) नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18. पृथ्वीराज बी.पी., आयएएस (2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

19. डॉ. हेमंत वसेकर, आयएएस (2015) सीईओ,(NRLM) मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

20. डॉ. सुधाकर शिंदे, आयआरएस (1997) यांची एएमसी, बीएमसी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.