Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १५, २०१४

जिल्हयात सरासरी 67 टक्के मतदान

जिल्हयात सरासरी 67 टक्के मतदान

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

107 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद




चंद्रपूर दि.15- विधानसभेसाठी आज झालेली मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळित पार पडली असून चंद्रपूर जिल्हयातील सहाही मतदान संघात सरासरी 67 टक्के मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.52 टक्के मतदान झाले होते. 107 उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे. मतमोजणी रविवार 19 ऑक्टोंबर 2014 सकाळी 8 वाजता होणार आहे.

चंद्रपूर जिल्हयातील राजूरा-2 लाख 96 हजार 660, चंद्रपूर-3 लाख 58 हजार 27, बल्लारपूर-3 लाख 7 हजार 267, ब्रम्हपूरी-2 लाख 55 हजार 336, चिमूर-2 लाख 62 हजार 75 व वरोरा-2 लाख 79 हजार 834 असे एकूण 17 लाख 59 हजार 146 मतदार आहेत.

जिल्हयात सहाही मतदार संघात 5 वाजेपर्यंत राजूरा-55.18 टक्के, चंद्रपूर 54.32 टक्के, बल्लारपूर-58.68, ब्रम्हपूरी-75.50, चिमूर-45.30 टक्के व वरोरा-57.85 टक्के मतदान झाले होते. 5 वाजेपर्यंत एकूण 10 लाख 11 हजार 802 मतदारांनी जिल्हयातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी मतदान केले. यात 5 लाख 41 हजार 994 पुरुष तर 4 लाख 69 हजार 808 महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी 59.31 टक्के तर महिलांची मतदानाची टक्केवारी 55.58 एवढी आहे.

2009 च्या विधानसभा निवडणूकीत राजूरा 67.34, चंद्रपूर 50.04, बल्लारपूर 61.13, ब्रम्हपूरी 66.97, चिमूर 71,79 व वरोरा 63.96 असे एकूण 63.53 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत राजूरा 68.87, चंद्रपूर 54.79, बल्लारपूर 61.31, वरोरा 62.76, ब्रम्हपूरी 71.16 व चिमूर 71.77 टक्के मतदान झाले होते.

विधानसभा निवडणूकीची मतमोजणी 19 ऑक्टोंबरला होणार आहे. 70-राजूरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरा, 71-चंद्रपूर जिल्हा उद्योग भवन (नवीन इमारत) चंद्रपूर, 72-बल्लारपूर- उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल, 73-ब्रम्हपूरी- शासकीय तंत्र निकेतन नागभिड रोड ब्रम्हपूरी, 74-चिमूर राजीव गांधी भवन तहसिल कार्यालय परिसर चिमूर व 75-वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा या ठिकाणी त्या त्या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.