Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ३०, २०२०

कोसा उत्पादक शेतक-यांची आम आदमी पार्टीने घेतली दखल




चंद्रपूर/ प्रतिनिधी
जिल्ह्यात सावली व ब्रम्हपुरी तालुक्यातील काही गावात रेशीम शेती केली जाते परंतु या वर्गाकडे प्रशासनाचे नेहमी दुर्लक्ष होत असते . अशातच याही वर्षी सावली तालुक्यातील जिभगांव येथील काही राणकर्यानी कोसाची (रेशीम ) लागवड केली .

परंतु निसर्गाच्या लहरीपणामूळे यांची शेती पूर्णतः बुडाली यामध्ये राणकरी बांधवांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाली तरी पण प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते.
दिनांक 29/१०/२०२० रोजी कोसा उत्पादक शेतकऱ्यांनी आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या ॲड पारोमिताताई गोस्वामी यांना आप बिती सांगीतली असता दिनांक ३०/ नोव्हेंबरला आम आदमी पार्टीचे सावली तालुका अध्यक्ष श्री अनिल मडावी यांनी शिष्टमंडळ घेवून रेशीम विकास अधिकारी यांची भेट घेतली व कोसा उत्पादक शेतकऱ्यांना कोसा उत्पादनाची झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली असता रेशीम विकास अधिकारी श्री अवार्ड साहेब यांनी नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे मान्य करत . दिनांक २ नोव्हेंबरला शेतर्यांच्या बांधावर जावून कोसा उत्पादनाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून त्याला रेशीम कार्यालयाचा तांत्रिक रिपोर्ट जोडून जिल्हाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे आश्वासन दिले .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.