Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर ०८, २०२२

Election symbol of ShivSena Dhanushyaban | शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं


शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही

शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही



नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे



शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मात्र, निवडणुक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठविले आहे. धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाची मनाई करण्यात आली आहे. फक्त शिवसेना इतकंच नाव वापरण्यासही आयोगाची मनाई आहे. .शिवसेना-ठाकरे गट, शिवसेना-शिंदे गट अशी नावे स्वतंत्र निवडणूक चिन्हांसह वापरता येणार आहेत. 

शिवसेना-शिंदे गटानं कागदपत्र सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणुक आयोगाची बैठक झाली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाची ही बैठक तब्बल 4 तासानंतर संपली. शिवसेना आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने ही महत्वाची बैठक घेतली.

शिवसेनेला पुरावा सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिवसेनेने कागदपत्रांचा 700 पानांच गठ्ठा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्हावर त्वरित सुनावणी घेऊ नये अशी शिवसेनेची मागणी होती. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.


A very important update has come out regarding Shiv Sena's symbol. Uddhav Thackeray and Chief Minister Eknath Shinde's faction is fighting to get the bow and arrow symbol of Shiv Sena. However, the Election Commission has frozen the bow symbol. Uddhav Thackeray and Eknath Shinde have been banned by the Central Election Commission from using the bow symbol. The Commission is also prohibited from using the same name as Shiv Sena. .


Names like Shiv Sena-Thackeray group, Shiv Sena-Shinde group can be used with separate election symbols.


Election Commission meeting was held in Delhi after Shiv Sena-Shinde group submitted the document. The meeting was held under the leadership of Election Commissioner Rajeev Kumar. The meeting of the Central Election Commission ended after almost 4 hours. The Central Election Commission held this important meeting after submission of affidavit by Shiv Sena and Shinde group.


Shiv Sena was ordered by Election Commission to submit evidence. Accordingly, Shiv Sena had submitted only 700 pages of documents to the Election Commission. The Shiv Sena demanded that the Election Commission should not hold an immediate hearing on the bow and arrow symbol. Voting for the Andheri East Assembly by-election will be held on November 3 and counting of votes will be held on November 6.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.