Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर ०९, २०२२

online games ऑनलाईन गेम्स वर बंदी घाला |

खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्यांचे मुख्यमंत्र्याना पत्र 

चंद्रपूर :- हल्ली मोबाईल, टॅब किंवा टीव्हीवर ऑनलाईन गेम्स खेळणं ही अनेकांची सवय झाली आहे. पण ही सवय आता व्यसनामध्ये परावर्तीत होऊ लागली आहे. त्यामुळे या गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ऑनलाईन गेम्स वर बंदी घालण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर व आमदार  प्रतिभा  धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. 



एकेकाळी केवळ टाईमपास असलेलं ऑनलाईन गेमिंग सवय झाली आहे. आता आपल्या देशात ऑनलाईन गेमिंगची 'साथ' आली आहे. 24 तास तहान, भूक, झोप विसरून गेम खेळणारी तरूण पिढी तयार होत आहे. काही ऑनलाईन गेम्समध्ये पैसे कमावण्याची संधी असल्यामुळे जुगाराप्रमाणे त्याचं व्यसन लागत आहे. सध्या राज्यात मोबाईल द्वारे अनेक ऑनलाईन गेम चा सुळसुळाट झाला आहे. या गेमद्वारे सर्रासपणे जुगार खेळाला जात असल्याचे निर्दशनास येत आहे. या जुगाराच्या विळख्यात तरुण पिढी तसेच लहान मुले सुध्दा गुंतलेली आहे. संपूर्ण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. या संपूर्ण ऑनलाईन गेम्स वर बंदी आणण्यासाठी यासंदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्न देखील उपस्थीत केला होता. अलीकडेच काही दिवसा आधी चंद्रपूर येथील देवाडा गावातील युवकाने ऑनलाईन रम्मी या खेळाच्या नादातून पत्नीची जीवन यात्रा संपून स्वतः आत्महत्या केली. असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत व हजारो कुटुंबे उध्वस्त होत आहे. 


तामिलनाडू सकारने अलीकडेच अध्यादेश काढून ऑनलाईन च्या सर्व खेळांवर बंदी घातली आहे. बेटिंग आणि जुगारासह ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यासाठी हा अध्यादेश काढला. ज्याद्वारे जुगार आणि ऑनलाइन गेमवर बंदी घालण्यात येणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के. चंद्रू यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. तसा अध्यादेश महाराष्ट्र सरकराने काढून युवा पिढीला अशी मागणी खासदार बाळू धानोरकर व  आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.



संबंधित शोध

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.