Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, डिसेंबर ०९, २०२२

नायलॉन मांजा विक्री केल्यास इतका मोठा होईल दंड | Ban Nylon Manja



चंद्रपूर शहरात नायलॉन मांजाविरुद्ध मनपा करणार कडक कारवाई

विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई

चंद्रपूर Chandrapur 9 डिसेंबर : Ban Nylon Manja 
नायलॉन मांजामुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयातीवर पूर्णपणे बंदी आणली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कडक कारवाई केली जाणार आहे. विक्री केल्यास १० हजारांचा दंड, तर साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहे.
दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभराआधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरात हा धागा वापरला जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहेत. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहेत. Ban Nylon Manja


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.