लोहारा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत नर कोल्ह्याच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली, हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे सदस्य ज्युबी शेख कामानिमित्त जात असतांना त्यांना कोल्हा चा अपघातात मृत्यू झालेला आढळला. चंद्रपूर-सावली दरम्यान २२ दिवसात ३ कोल्ह्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना महामार्ग क्रमांक NH -९३० वर घडली आहे, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर यांना ह्या घटनेची माहिती हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे व सदस्य अमित देशमुख यांनी दिली. #Road #Accident #fox
अपघातात वन्यप्राण्यांचे मृत्यू होण्याच्या घटनेचे सत्र सुरूच आहे पण राष्ट्रीय महामार्ग किंवा वनविभाग गंभीर नसल्याचे लक्षात येते, ह्यांच्यापैकी कुठल्याही अधिकाऱ्यांनी फोन करून दखल सुद्धा घेतली नाही,आणखी किती वन्यप्राण्यांचे जीव हा महामार्ग घेणार आहे ह्यावर प्रश्नचिन्हच आहे, चंद्रपूर-मूल महामार्गावर अनेक वन्यप्राण्यांनी जीव गमावला आहे, एकीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पदमापूर ते मोहुर्ली हा रस्ता संध्याकाळी ६ नंतर बंद असतो मग चंद्रपूर-मूल रस्ता का नाही बंद करू शकत ? हा कसला दुजाभाव.पदमापूर ते मोहुर्ली रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावले आहे खरी गरज तर चंद्रपूर-मूल महामार्गावर आहे, जरी हा पर्याय इतर लोकांसाठी डोकेदुखी असेल पण पदमापूर ते मोहुर्ली रस्त्यावर लोकांना डोकेदुखी होत नाही हेच नवल.
व्याहाड गावाजवळ नर कोल्ह्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू
https://www.khabarbat.in/2023/01/road-accident-marathinews-fox.html
पदमापूर ते मोहुर्ली रस्त्याच्या तुलनेत चंद्रपूर-मूल महामार्गावर जास्त वन्यप्राणी मरतात मग हा महामार्ग का बंद ठेऊ शकत नाही, तात्पुरता उपाय योजना म्हणून हा प्रयोग करायलाच पाहिजे , नाहीतर असेच अपघातात वन्यप्राणी मृत्युमुखी पडत राहतील, प्रजनन काळ सुरु असतांना ३ कोल्ह्यांना जीव गमवावा लागलं याला जबाबदार कुणाला धरायचं वनविभाग कि राष्ट्रीय महामार्ग यांना, ना वेगावर मर्यादा, ना स्पीड ब्रेकर, ना बॅरिकेट काहीही कुणाला पडलेली नाही,१०० च्या वर भरधाव वेगात गाड्या चालतात,हे मुके जनावर काय तग धरणार आहे, ज्या हत्त्यांचं आगमन गडचिरोलीला झालेलं आहे त्यांनी तर ह्या महामार्गावर यावं आणि हा मार्ग रोखून धरावा आणि ट्रॅफिक वर आळा घालावं कारण प्रशासन तर काही करतच नाही आहे ,मग प्राण्यांकडून अपेक्षा करावी. #Road #Accident #fox
भ्रमण मार्गावर वन्यप्राण्यांचा होणारे अपघात रोखण्यासाठी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी च्या वतीने लवकरात लवकर उपशमन योजना राबविण्याचे आव्हान करत आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील इतरही वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या वन्यजीव संस्थांनी राष्ट्रीय महामार्ग किंवा वनविभाग यांना पत्र लिहावं आणि उपशमन योजना राबविण्यास विनंती करावी जेणेकरून वन्यजीवांचे होणारे अपघातात थांबतील.
चंद्रपूर-मूल हा नॅशनल हायवे क्रमांक ९३० असून जवळपास जंगलातूनच जातो,हा हायवे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर ) क्षेत्राला लागून जातो, चंद्रपूर प्रादेशिक व वनविकास महामंडळ हे जंगल क्षेत्र या हायवे ला लागूनच आहे,म्हणून वन्यजीवांचे हायवे ओलांडताना असंख्य वन्यजीवांचा नाहक बळी गेलेला आहे, तरीही अजून पर्यंत या हायवे वर वन्यजीवांसाठी उपशमन योजना राबविल्या जात नाही आहे, आणखी किती वन्यजीवांचा बळी गेल्यावर शासनाला जाग येणार आहे माहिती नाही.