Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०९, २०२२

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर ने जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला |

 

Wockhardt Hospitals, Nagpur World Physiotherapy Day

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर ने जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा केला

नागपूर : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त फिजिओथेरपी विभागातर्फे वृद्धाश्रम आणि जवळच्या पोलीस ठाण्यामधील लोकांच्या वेदना व दुःख  दूर करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यंदाच्या जागतिक फिजिओथेरपी दिनाची थीम ‘ऑस्टियोआर्थराइटिसचे उपचार’ अशी आहे. विभागप्रमुख डॉ. अलका नाकाडे यांच्या नेतृत्वाखालील फिजिओथेरपी टीमने पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम करून आपले सांधे निरोगी ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांच्यापैकी कोणाला ऑस्टियोआर्थराइटिसची लक्षणे आढळल्यास त्यांना व्यायामाची पथ्ये व व्यायामाच्या पद्धती यासंदर्भात माहिती देण्यात आली.

डॉ. अलका यांनी सांगितले,  "आम्ही वृद्धाश्रमला देखील भेट दिली होती, तिथे आम्ही जवळपास 20 ते 25 वृद्ध लोकांना भेटलो होतो, त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या तक्रारींनुसार व्यायाम समजावून सांगितला. आम्ही 8 सप्टेंबर रोजी सर्व रुग्णांसाठी  आणि नातेवाईकांसाठी त्यांच्या वजन सहन करण्याची स्थिती  तपासण्यासाठी हॉस्पिटलमध्ये विनामूल्य फुट अनालिसिस मशीन ची व्यवस्था केली होती आणि ते समजा अयोग्य आढळून आले तर गुडघ्यांच्या ऑस्टियोआर्थराइटिसला कारणीभूत ठरते". 

8 सप्टेंबर 2022 रोजी रुग्णालय आपल्या आवारात फुट अनालिसिस मशीन देखील स्थापित करेल ज्यामध्ये रूग्ण आणि नातेवाईक कुठलीही फी न देता त्याचा फायदा घेऊ शकतात.

श्री अभिनंदन दस्तेनवार, केंद्र प्रमुख, वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले,  “आम्ही आमच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना रोग टाळण्यासाठी समाजात योगदान देण्यास सक्षम असणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम या दिशेने फक्त एक लहान पाऊल आहे.”


Wockhardt Hospitals, Nagpur World Physiotherapy Day

Wockhardt Hospitals, Nagpur ... World Physiotherapy Day.jpeg

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.