नागपूर:
प्रेम आंधळ असते आणि प्रेमात काहीही होऊ शकते. असाच आंधळ्या प्रेमाचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. हि घटना आहे नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील,आठव्या वर्गात शिकणाऱ्या बहिणीच्या वर्ग मैत्रीणीवर सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाची मैत्री झाली.
हळूहळू प्रेम बहरू लागले, मुलाची बहीण हि गर्भवती झालेल्या मुलीची मैत्रीण असल्याने एकमेकांचे घरी येणे जाणे सुरु झाले .बहीण घरी नसतांनाही एकमेकांच्या घरी दोघेही जाणे येणे करत होते.कधी पुस्तक नेऊन देण्याच्या बहाण्याने तर कधी पुस्तक आनण्याच्या बहाण्याने ते ये जा करत होते. २५ जानेवारीला बबली (बदललेले नाव) ही मैत्रिणीला भेटायला घरी आली.
मात्र, मैत्रिण शेतात गेली होती. त्यावेळी बंटी एकटाच घरी होता. बंटीने तिला प्रेमाची मागणी घातली. तिनेही होकार दिला. बबलीचे आईवडिल शेतात गेल्यानंतर त्यांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एप्रिल महिन्यात बबलीच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याची धक्का दायक माहिती पुढे आली.
सर्वांना हे ऐकून धक्का बसला. दोघांना हि बसवून विचारपूस करण्यात आली . प्रियकर बंटीचे नाव समोर आले.बंटीला विचारपूस करण्यात आली. त्याने माझे तिच्यावर प्रेम असून आम्ही लग्न करणार आहे अशी कबुली दिली. नंतर प्रकरण मौदा पोलीस ठाण्यात पोहचले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सातवीत असलेल्या बंटीला ताब्यात घेऊन बालनिरीक्षणगृहात रवानगी केली.