Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२

समाजकार्य महाविद्यालयात युवतींचे संरक्षण या विषयावर कार्यशाळा | Protection of Girls Protection Alliance




कामठी :  समाजकार्य महाविद्यालय कामठी येथील महिला तक्रार निवारण समिती, कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाउंडेशन, दिल्ली, महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था, धरमपेठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गर्ल्स प्रोटेक्शन युतीचे संरक्षण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 


अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाल कल्याण समितीच्या श्रीमती वर्षा पाटील व श्रीमती राणी कळमकर  समिती प्रमुख डॉ. प्रणाली पाटील व सदस्य डॉ. सविता चिवंडे मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. प्रणाली पाटील यांनी प्रास्ताविक भाषणातून महिला तक्रार निवारण समितीच्या कार्याचा व उद्दिष्टांचा परिचय विद्यार्थिनींना करून दिला. यानंतर वर्षा पाटील व राणी कळमकर या मार्गदर्शकांनी महाविद्यालयातील मुलींसोबत संवाद साधून मुलींच्या लैंगिक छळाच्या संदर्भात सविस्तर माहिती देऊन लैंगिक छळापासून स्वतःची सुरक्षा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.  

अलीकडे मुलीबरोबर मुलेसुद्धा लैंगिक छळाचे बळी पडत आहेत, याविषयीची अनेक उदाहरणे दिली. मुलींनी पुरुषांकडून होणारा नकोसा स्पर्श लवकर ओळखणे आवश्यक आहे असे सांगून युवतींच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजना सुचविल्या. सोबतचपोक्सो ॲक्ट २०१२, बाल न्याय काळजी आणि संरक्षण कायदा-२०१५ याविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली.  डॉ. रुबीना अन्सारी यांनी सायबर क्राईमबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींनी कशा प्रकारे जागरूक राहिले पाहिजे याविषयी विस्तृत विवेचन केले. कार्यशाळेचे संचालन व आभार डॉ. सविता चिवंडे  यांनी केले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Kamthi : A one day workshop was organized on the topic of Protection of Girls Protection Alliance in association with Women Grievance Redressal Committee of College of Social Work Kamthi, Kailas Satyarthi Children Foundation, Delhi, Women Multipurpose Social Organization, Dharampeth Nagpur.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.