चंद्रपूर, 22 नोव्हेंबर, २०२२: भारतातील आघाडीच्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेली, निवा बुपा, तिच्या वाढीच्या पुढील टप्प्याचा एक भाग म्हणून, चंद्रपूरमध्ये पुढील ५ वर्षांत, सुमारे ५,००० लोकांना हेल्थ कव्हरेज प्रदान करण्याचे निवा बुपाचे उद्दिष्ट आहे. ग्राहक, चंद्रपूरमधील ३ नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये आणि देशभरातील ९,१०० पेक्षा अधिक रुग्णालयांमध्ये कॅशलेस लाभ घेऊ शकतात.
(Trusted by over 70 lakh happy customers, Niva Bupa provides a wide range of health insurance plans to suit every need.)
भारतातील गंभीर आजारातील आणि जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांच्या वाढीमुळे, आरोग्य विमा, एक प्राधान्य बनला आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्याचा प्रवेश लक्षणीयरीत्या वाढला आहे. शिवाय, वैद्यकीय महागाईमुळे लोकांना हळूहळू आरोग्य आणि संपत्ती, या दोन्हींचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विम्याचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे, उच्च प्रीमियम आणि विशिष्ट अटींवरील प्रतीक्षा कालावधी टाळण्यासाठी, एखाद्याने आयुष्याच्या सुरुवातीलाच, सर्वसमावेशक आरोग्य विमा योजनेत गुंतवणूक केली पाहिजे.
निवा बुपाने, चंद्रपूरमध्ये पुढील ५ वर्षांत सुमारे ५ कोटी रुपयांचे सकल लिखित प्रीमियमची नोंद करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी, २०२७ पर्यंत सुमारे १,१०० एजंट्सना कामावर नियुक्त करण्याची योजना आखत असल्याने, लोकांसाठी व्यवसायाच्या संधीही आणल्या जाणार आहेत. कंपनीद्वारे पुरेसे प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान केले जातील आणि शहरात राहणाऱ्या महिला आणि गृहिणींना विमा एजंट होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास मदत होईल.
महाराष्ट्रातील तिच्या विस्तार योजनांबद्दल बोलताना, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या किरकोळ विक्री विभागाचे संचालक, श्री. अंकुर खरबंदा – म्हणाले, “निवा बुपा येथे, देशातील प्रत्येक व्यक्तीला तिच्या सोयीनुसार दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या हेतूने, आम्ही आरोग्य विमा जागरुकता आणि क्षेत्रांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी टियर २, ३ आणि त्यापुढील बाजारपेठांसह, भारतभर कार्यालयांचा विस्तार करत आहोत. निवा बुपाचे भारतातील आरोग्य विम्याचे लोकशाहीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, आणि आजच्या विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करणारी उत्पादने सादर करण्यासाठी, आम्ही सतत नवनवीन प्रयत्न करत आहोत.”
निवा बुपा हा, संपूर्ण भारतातील लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याचा सुमारे बारा वर्षांचा अनुभव असलेला, देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे. ही कंपनी, आजच्या ग्राहकांच्या विविध आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी नुकसानभरपाई, निश्चित लाभ आणि रोग-विशिष्ट उत्पादने जसे की रिअॅश्यूर, हेल्थ प्रेमिया, गोअॅक्टिव्ह, सिनियर फर्स्ट, क्रिटिकेअर, हेल्थ रिचार्ज, स्मार्टहेल्थ+ रायडर, ट्रॅव्हलअॅश्यूर, इत्यादींसह योजनांची एक विस्तृत श्रेणी देऊ करते.