कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा रजतोत्सव समारोह
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रजतोत्सवा निमित्त एक विशेष कार्यक्रम आज रविवार, दि. 16 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला. विश्वविद्यालयाच्या रजतोत्सवानिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी या नात्याने मा. श्री. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्राी, जहाजबांधणी, रस्ते वाहतूक व महामार्ग उपस्थित होते . विशेष अतिथी या नात्याने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू मा. डॉ. पंकज चांदे आणि मा. पूर्व कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, मा. कुलगुरू, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे मा. कुलगुरू प्रो. मधुसूदन पेन्ना होते. कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, प्रो नंदा पुरी, अधिष्ठाता, संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकाय, रजतोत्सव समन्वयक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
---
----Addressing Rajat Mahotsav program organised by Kavikulguru Kalidas Sanskrit University, Nagpur https://t.co/pxw1xGNhCj
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 16, 2022
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते वेदमंत्रांच्या उद्घोषात दीप प्रज्वलनाने झाला. विद्यापीठ गीतानंतर मा. श्री नितीन जी गडकरी , मा संस्थापक कुलगुरू डॉ पंकज चांदे , मा कुलगुरू प्रो श्रीनिवास वरखेडी यांचा शाल, श्रीफळ, सरस्वती प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
लघुचित्रपट “प्रसादचिह्नानि” प्रदर्शित
रजतमहोत्सवाचे औचित्य साधून विश्वविद्यालयाच्या 25 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेणारा लघुचित्रपट “प्रसादचिह्नानि” या प्रसंगी प्रदर्शित करण्यात आला. विश्वद्यालय निर्मित या लघुचित्रपटाचे लेखन, निवेदन आणि दिग्दर्शन जनसंपर्क अधिकारी डॉ रेणुका बोकारे यांनी केले होते.
विश्वविद्यालयातर्फे संपूर्ण वर्षात रजत महोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा आलेख रजतोत्सव समिती समन्वयक प्रो कृष्णकुमार पांडेय यांनी प्रस्तुत केला.
*समर्थ पोर्टल चे लोकार्पण
1 भारत सरकार तर्फे तयार करण्यात आलेल्या समर्थ पोर्टल चे उद्घाटन मा श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे महाराष्ट्रातील समर्थ पोर्टल स्वीकृत करणारे पहिले विद्यापीठ आहे. या पोर्टल द्वारे प्रवेश, परीक्षा, निकाल आणि अन्य सर्व प्रशासकीय कामकाज online पद्धतीने करण्यात येणार आहे. श्री राजीव रंजन मिश्रा, संचालक महर्षी पाणिनी संगणक केंद्र यांच्या परिश्रमातून है पोर्टल तयार करण्यात आले.
शोधसंहिता संशोधन जर्नल चे प्रकाशन
2 विश्वविद्यालयाच्या युजीसी केअर लिस्टेड ‘‘शोधसंहिता’’ या वार्षिकांकाचे प्रकाशन - शोधसंहिता प्रकाशन .. गेल्या 10 वर्षांपासून प्रकाशित होत असलेले ugc care listed मधे समाविष्ट संशोधन जर्नल चा आज 9 वा अंक प्रकाशित झाला . मा कुलगुरु प्रो पेन्ना यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली डॉ रेणुका बोकारे उपसंचालक, संशोधन व प्रकाशन विभाग यांनी या अंकाचे संपादन केले आहे. श्री उमेश पाटील आणि श्री अभिलाष नील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
शोधसंहिता पोर्टल उद्घाटन
शोधसंहिता पोर्टल चे उद्घाटनही या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. शोधसंहिता हे विश्वविद्यालयाचे ugc care listed रिसर्च जर्नल आहे. संपूर्ण भारतात प्रख्यात असलेले हे जर्नल सर्वांना सहज उपलब्ध व्हावे यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टल द्वारे संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांना online registration द्वारे आपले लेख पाठवता येतील . शोधसंहिता जर्नल मधे लेख प्रकाशित होण्याची संपूर्ण प्रक्रिया ही संशोधकांना पारदर्शक पद्धतीने आणि सहज उपलब्ध व्हावी यासाठीच या पोर्टल ची निर्मिती करण्यात आली आहे. Registration to publication अशा सर्व टप्प्यांवरचा संशोधन लेखाचा प्रवास यामधे अंतर्भूत असून, जे गेट या रिसर्च पोर्टल मधे ते समाविष्ट होणार आहे. शोधसंहिता चा प्रवास आणि प्रक्रिया ही प्रिंट ते डिजिटल रुपात साकारण्याचे महत्त्वाचे कार्य हे या रजतोत्सवी वर्षातील विश्वविद्यालयाच्या संशोधन व प्रकाशन विभागाची मोठीच उपलब्धी आहे. डॉ रेणुका बोकारे, उपसंचालक, संशोधन व प्रकाशन विभाग यांनी हे कार्य यशस्वी रित्या पूर्ण केले असून आणि डॉ दीपक कापडे ग्रंथपाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विशेष म्हणजे आज प्रकाशित झालेला शोधसंहिता चा अंक... देखील या पोर्टल द्वारे लोकार्पित करण्यात आला.
प्रमुख अतिथी मा श्री नितीन जी गडकरी आपल्या भाषणात म्हणाले ,’’
कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे संस्कृत जगाच्या व्यासपीठावर पोचवावे. संस्कृत ही कुठल्याही विशिष्ट गटाची भाषा नसून ती सर्वांची भाषा आहे. संस्कृत for all हे विद्यापीठाचे ध्येय असून त्यानुसार विद्यापीठ सर्वसमावेशक, समाजाच्या सर्व स्तरापर्यंत सर्वांपर्यंत पोचेल असे विविध कार्यक्रम आणि अभ्यासक्रम राबवित आहे. या विद्यापीठाला प्रतिष्ठित करण्यामध्ये डॉ चांदे, डॉ वैद्य, डॉ वरखेडी आणि डॉ पेन्ना यांनी मोठे योगदान दिले आहे. आधुनिक काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाआधारे सर्वोत्तम सादरीकरण करून एक museum तयार करावे. त्यामुळे जगभरातील लोक येथे पर्यटनासाठी येतीलच आणि संस्कृत शिकण्यासाठी आकृष्ट होतील. डॉ.पेन्ना यांनी ज्ञानेश्वरी संस्कृत मधून आणली त्याचप्रमाणे विद्यापीठाने विनोबा भावे यांचे गीतासार आणि तुकडोजी महाराज यांचे साहित्य ही संस्कृत मध्ये आणावे अशी अपेक्षा व्यक्त केली. भारताचा प्राचीन ज्ञान वारसा, भारतीय संस्कृती जगभरात पोचविण्याचे कार्य विद्यापीठाने करावे असे बोलून रजतोत्सवा निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संस्थापक कुलगुरू डॉ पंकज चांदे आपल्या भाषणात म्हणाले कालिदास विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास सुरुवात करावी. विद्यापीठाने उर्जस्वल परंपरा कायम ठेवावी असे सांगून आपले विद्यापीठ अधिकाधिक उन्नत व्हावे..... अशा शुभेच्छा दिल्या.
मा कुलगुरू प्रो श्रीनिवास वरखेडी आपल्या भावपूर्ण भाषणात म्हणाले, विकास यात्रेत जे स्नेह सहकार्य मिळाले तो काळ माझ्यासाठी अविस्मरणीय आहे . कुलगुरु डॉ चांदे यांनी या विद्यापीठाची पायभरणी केली. विद्यापीठाचे व्यवस्थापन अतिशय उत्तम असून, असे व्यवस्थापन मी कोणत्याच संस्थेत बघितले नाही. येथे सर्वांनी टीम म्हणून कार्य केले आणि संपूर्ण भारतभरात विद्यापीठाला प्रतिष्ठा, गौरव प्राप्त झाला आहे.
कालिदास विद्यापीठात कार्य करण्यामुळेच मला केंद्रीय संस्कृत विद्यापीठात कार्य करण्याची संधी मिळाली.
राष्ट्रीय शिक्षण नीती मधील अनेक गोष्टी डॉ चांदे यांनी यापूर्वीच केला आहे. संस्कृत मुख्य प्रवाहात यावे आणि संस्कृत विद्यापीठ बहुविषयक असावे हे राष्ट्रीय शिक्षण नीती मधील अपेक्षा डॉ चांदे यांनी इथे केला आहे त्यामुळे कालिदास विद्यापीठ हे त्याचे आदर्श प्रारूप आहे. कालिदास विद्यापीठ हे स्वावलंबी विद्यापीठ असून महत्त्वपूर्ण विद्यापीठ आहे. A प्लस प्लस मिळवण्यासाठी येणारा काळ आव्हानात्मक आहे. येणाऱ्या चार वर्ष तुम्हाला प्रत्येकाला कठोर निरंतर परिश्रम करावे लागतील.
आपला संपूर्ण performance तुम्हाला कायम ठेवावा लागेल.
अध्यक्षीय भाषणात मा कुलगुरू प्रो मधुसूदन पेन्ना यांनी कालिदास संस्कृत विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करेल असे आश्वस्त केले. शास्त्ररक्षण शास्त्रसंवर्धन आणि शास्त्र परंपरा पुढे नेण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नरत राहू असे सांगून रजतोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे संचालन डॉ रेणुका करंदीकर यांनी केले शांतीपाठाने कार्यक्रमाची समाप्ती झाली.
प्रस्तुत कार्यक्रमाला विश्वविद्यालयाच्या विकासात योगदान देणारा नागपूरचा संस्कृत परिवार, हितचिंतक रामटेक व नागपूर येथील पत्रकार , विश्वविद्यालयाच्या विविध संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थी तसेच सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व सहकारी तसेच निवृत्त अधिकारी आणि प्राध्यापक , आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते