Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २९, २०२२

वेटलिफ्टिंग स्पर्धेत आहाना कपुरियाला सुवर्णपदक

नागपूर । वेटलिफ्टिंग महाराष्ट्रतर्फे नुकत्याच आयोजित महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 160 किलो वजनी गटात १७ वर्ष वयोगटात आहाना प्रवीण कपुरिया हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्या या कामगिरीवर सर्व स्‍तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डिसेंबरअखेरीस आणि जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत  नागरकोइल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली आहे. 



सेंटर पॉइंट स्कूलची विद्यार्थिनी आहाना प्रवीण कपुरिया हिने काही दिवसांपूर्वी नागपुरातील मानकापूर स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात तिला सुवर्णपदक मिळाले होते. याशिवाय 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या राज्य शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती खेळणार आहे. तिने आपल्या आभ्यासात तरुणांसाठी राष्ट्रीय विक्रम स्थापित केले असून, यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या यशस्वी कामगिरीसाठी सेंटर पॉइंट स्कूल व्यवस्थापन आणि शिक्षकांनी सहकार्य केले. गेल्या वर्षभरापासून संतोष सर आणि विशाल सरांनी तिला मदत करीत प्रशिक्षण दिले. अधिकाधिक मुलांनी खेळात पुढे यावे, अशी इच्छा आहाना प्रवीण कपुरिया हिने व्यक्त केली आहे. 


Miss Aahana Pravin kapuria 17 years old she has won the gold medal (160kg total)  in the state competition in Maharashtra organised by weightlifting  Maharashtra and she has been selected for nationals which would be held in Nagercoil in the end of December till the first week of January. She has won the DSO competition held in mankapur stadium few days back in which she had got the gold and she would be going to play school state for weightlifting which would be held in between 12th December till the 15th of December 2022. 


She has broken the national record for the youth in her practice and is  aiming to set a new record in the national this year. She is student of centre point school and the school has helped her in all the possible ways for her growth. Santosh sir and Vishal Sir have helped her and coached her   since last one  year. We Really wish that more kids come forward in sports


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.