वर्ड स्टेंथलिफ्टिंग फेडरेशन आणि किरकिस्थान नॅशनल स्टेंथलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने बिस्केक
किरर्गीस्तान येथे नवव्या जागतिक लिफ्टिंग व इंकलाईन बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील मोसिन बानो खान चंद्रपूर यांनी 65 किलो ग्रॅम सीनियर वुमन या गटात इंकलाईन, बेंचप्रेस मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले तर स्टेंथलिफ्टिंग मध्ये ३०० किलो वजन उचलून रौप पदक प्राप्त केले.
कर्लिंग या प्रकारात 40 किलो वजन उचलून नवीन विश्वविक्रम नोंदविला आहे. याशिवाय महेश सावरकर नागपूर यांनी 85 किलोग्रॅम सीनियर मेन या गटात स्ट्रेंथलिफ्टिंग 450 किलो आणि इन्कलाईन बेंच प्रेस या दोन्ही प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले तर शेख कौसर शेख खट्टू (वाशिम) यांनी 68 किलोग्रॅम मास्टर एक गटात स्ट्रेंथलिफ्टिंग 340 किलो आणि इन्कलाइन प्रेस बेंच प्रेस या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. या खेळाडूंचे महाराष्ट्र स्ट्रेंथलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत डोणगावकर, महासचिव विनायक जवळकर, कोषाध्यक्ष पराग पाठक, प्रमोद वालमांढरे, सचिन माने, श्रीकांत वरणकर, अमित दुर्गे, सूर्यकांत उंबरकर, लक्ष्मीकांत मेश्राम, आनंद डाबरे, गजानन पांडे आणि संदीप महंतो यांनी अभिनंदन केले.
Mosin Bano Khan of Chandrapur won the World Stenlifting Championship