Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे २७, २०२३

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 | पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरती; २७ मेपासून अर्ज प्रक्रिया

Pashusavardhan Vibhag Recruitment 2023 |


पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची (Pashusavardhan Vibhag Recruitment 2023) प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. पशुसंवर्धन विभागात सर्वात मोठी भरती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केली आहे.

लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेत ही पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे. (Pashusavardhan Vibhag Recruitment 2023)



यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची ०३ पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत.

Recruitment of Various Posts
Important Events Dates
  • Commencement of on-line registration of application 27/05/2023 10:00 AM
  • Closure of registration of application 11/06/2023
  • Closure for editing application details 11/06/2023
  • Last date for printing your application 26/06/2023
  • Online Fee Payment 27/05/2023 10:00 AM to 11/06/2023

यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. २७ मे २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. या भरतीसाठी परिक्षा जुलै महिन्यात होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

ऑनलाईन भरतीची लिंक | https://ibpsonline.ibps.in/cahmay23/


ऑनलाईन भरतीची लिंक | https://ibpsonline.ibps.in/cahmay23/













SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.