Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे २७, २०२३

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी दुखवटा | Narayan Dhanorkar

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी दुखवटा; वडील नारायण धानोरकर यांचे निधन




चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी दुखवटा; वडील नारायण धानोरकर यांचे निधन


चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर तथा भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी 27 मे रोजी सायंकाळी 5.30 नागपूर येथे निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.
त्यांच्यावर नागपूर येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

नारायण धानोरकर हे पेशाने शिक्षक होते. त्यांच्यामागे दोन मुले खासदार बाळू धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुलगी सौ. अनिता बोबडे, सून आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या रविवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 9 वाजता भद्रावती येथील धानोरकर निवासस्थान येथून अंत्ययात्रा निघेल. जैन मंदिर स्मशानभूमी येथे पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Balu Dhanorkar, pratibha Dhanorkar, Anil Dhanorkar, Narayan Dhanorkar, bhadarawati, Warora, bhdrawati, Chandrapur, Maharashtra India politics 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.