Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मे २७, २०२३

चिंचोली गावात वादळी वाऱ्याने केला कहर, झाले होत्याचे नव्हते Chincholi village was wreaked by storm, which was not expected



कारंजा घाडगे- तालुक्यातील चिंचोली येथे आज दि,27 शनिवार ला सायंकाळ च्या सुमारास विजेच्या कडकडाट आणि गारपीट सह पावसाचे आगमन झाले, सायंकाळी ५:३० वाजता सुरू झालेल्या पावसामुळे रौद्र रूप धारण करत ३० मिनिटांच्या कालावधीत सर्वत्र थैमान घातले व गावातील काही लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात किसना सोनोने यांच्या घरावरील संपूर्ण टीनाचे छत रस्त्यापलिकडे उडाले.




तर देविदास डिग्रसे यांच्या पाळण्यात झोपून असलेल्या नातवाला चक्क दोन मिनिटे आधी काढून घेतल्यामुळे सुदैवाने बचावला कारण पुढील दोनच मिनिटात छतासह पाळणाही उडून गेला.

ग्रामपंचायतीच्या परिसरातील सोलार पॅनल चे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हवेच्या जोरदार वेगाने विजेच्या तारा तुटून पडल्या त्यामुळे गावात अंधार पडला आहे. शासकीय यंत्रणेने घटनास्थळी जाऊन पाहणी करून आर्थिक मदत घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. 




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.