मुल तालुक्यातील फुलझरी जंगलातील बांबु कटाई कामगारांना ठरलेल्या दराप्रमाणे मजुरी द्यावी ही मागणी घेऊन जानाळा येथे श्रमिक एल्गारचे वतीने रास्ता आंदोलन करण्यात आले व आंदोलनानंतर रात्रभर मजुरीचे वाटप करण्यात आले.
बल्लारपूर पेपर मिलचे वतीने फुलझरी येथे मागील 2 महीण्यापासुन बांबु कटाईचे काम सुरू होते. या कामावर मध्यप्रदेश, गोंदिया जिल्हा व परीसरातील मजुर मोठया प्रमाणात बांबु कटाईचे काम करीत होते. सदर मजुरांना 11 रूपये प्रती बंडल दिल्या जात होते परंतु हा दर परवडण्यासारखा नसल्यामुळे मजुरांनी एक महीण्यापुर्वी काम बंद करून जंगल सत्याग्रह आंदोलन पुकारला होता. या आंदोलनाची दखल घेत बल्लारपुर पेपर मिलचे अधिकाÚयांनी मजुरांची बैठक घेऊन 12 रूपये प्रती बंडलप्रमाणे दर देण्याचे मान्य केल्याने पुर्ववत कामाला सुरवात करण्यात आली.
काम पुर्ण झाले व होळीचा सणही असल्याने मजुरांना मजुरीची आवश्यकता होती परंतु बल्लारपुरचे अधिकारी 11 रूपये प्रती बंडलप्रमाणे मजुरीचे वाटप सुरू केले त्यामुळे मजुरांमध्ये असंतोष निर्माण होऊन ठरलेल्या दराप्रमाणेच मजुरी मिळत नसल्याने मजुरी घेण्यास नकार दिला. श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड.पारोमिता गोस्वामी यांनीही पेपर मिल व्यवस्थापनाला समजविण्याचा प्रयत्न केला परंतु मजुरांच्या भुमिकेला मानत नसल्याने 25 मार्चला रात्रो 9.30 वाजता जानाळा येथे चंद्रपूर - मुल मार्ग बंद करण्यात आला. यावेळी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले परंतु मजुर हटण्यास तयार नव्हते. मजुरांची भुमिका ठाम असल्याने बिल्टचे अधिकाÚयांनी 12 रूपये दर देण्याचे मान्य केंले. मजुरी ही त्याचवेळी वाटपाला सुरवात झाली पुर्ण रात्र व दिवसभर जवळपास 45 लाख रूपये पोलीसांचे समक्ष मजुरी वाटप करण्यात आली.
या आंदोलनात अॅड. पारोमिता गोस्वामी सह विजय कोरेवार, विजय सिध्दावार, डाॅ. कल्याणकुमार, प्रविण चिचगरे, शंकर बोरूले, अनिल शेंडे, संगिता गेउाम, दिनेश घाटे, यमराज बोदलकर, वामन मउावी, किशोर बद्देलवार आदी श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते सहभागी होते.