मुख्य सूत्रधारास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी
मूल : मागील काही दिवसापासून बेपत्ता ताडाळा येथील नवभारत कन्या विद्यालयात नवव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यची माहिती आहे.
बेपत्ताप्रकरणी अटकेत असलेला मुख्य सूत्रधार सचिन वामन qलगोजवार या आरोपीस ३० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनैतिक शारीरिक संबंधातून बेपत्ताप्रकरणाचे नाट्य घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बेपत्ता विद्यार्थिनीच्या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांना गवसल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेला आरोपी जाळ्यात सापडला. आठ तारखेला झालेल्या द्वितीय सत्र परीक्षेच्या पेपरनंतर अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली. शाळेत मुलीची सायकल आढळून आली. बेपत्ता मुलगी आणि आरोपी सचिन ताडाळा येथील शेजारी-शेजारी राहात असून, प्रेमप्रकरणातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यात तिला गर्भधारणा झाली. गर्भपात करण्याच्या उद्देशाने विद्यार्थिनीला बेपत्ता केल्याचे तपासात पुढे आले आहे. द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर देण्याच्या उद्देशाने आलेली ही विद्यार्थिनी पेपर झाल्यानंतर नवभारत विद्यालयात सायकल ठेवून बेपत्ता झाली. दरम्यान, आरोपीने विद्यार्थिनीस चामोर्शी तालुक्यातील कडकापल्ली या गावामध्ये आपल्या एका मित्राच्या घरी नेऊन ठेवल्याचे माहित झाल्याने मूल पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फीरवली. त्यानंतर तिचा मृतदेह गडचिरोली जिल्ह्यात आढळून आला