Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १९, २०१७

संसार टिकविण्यात कौटुंबिक न्यायालयाचे मोलाचे योगदान

नागपूर : सध्या समाजात विवाह तुटण्याचे प्रमाण वाढत असताना मागील वर्षी कौटुंबिक न्यायालयाने 101 कुटुंबाचा संसार जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.
आज सुयोग येथील कौटुंबिक न्यायालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षा तेजस्विनी खाडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्याम अंभारे, न्यायाधीश डॉ. प्रशांत अग्निहोत्री, सुभाष कापरे, कोर्ट व्यवस्थापक डॉ. रसिका कस्तुरे, रजिस्ट्रार सुनील काटेकर, माहिती संचालक शिवाजी मानकर, राधाकृष्ण मुळी, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल, कीर्ती पांडे, सुयोग पत्रकार निवास शिबीर प्रमुख दिलीप जाधव उपस्थित होते.

यावेळी तेजस्विनी खाडे आणि प्रशांत अग्निहोत्री यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या कामाची माहिती दिली. सदर कौटुंबिक न्यायालय केवळ नागपूर महापालिका क्षेत्रासाठी आहे. दरवर्षी 25 ते 30 टक्के घटस्फोट प्रकरणात तडजोड होऊन पती-पत्नी पुन्हा संसार करण्यास तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. घटस्फोटाच्या प्रकरणात कौटुंबिक न्यायालय थेट लगेच घटस्फोटाचा निकाल देत नाही. कौटुंबिक न्यायालयाच्या नियमातच वाद सोडविण्यासाठी मध्यस्थ देण्याची तरतूद आहे. त्यामुळे समुपदेशक तटस्थपणे पती - पत्नी दोघांचीही बाजू समजून त्यांचे समुपदेशन करतात. यासाठी प्रत्येक न्यायाधिशाकडे दोन याप्रमाणे 8 समुपदेशक या न्यायालयात आहेत. त्यामुळे विवाह तोडण्यापेक्षा पहिल्यांदा संसार जोडण्याचा प्रयत्न या न्यायालयाकडून केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.