Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर १९, २०१७

कचरा उचलणाऱ्या व्यक्तींना मनपातर्फे ओळखपत्र


चंद्रपूर- शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील अनौपचारिकरीत्या कचरा उचलणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या स्वच्छतेच्या कार्याला सन्मान म्हणून ओळखपत्र देण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापन २०१६ च्या अधिनियमानुसार सदर व्यक्तींना घनकचरा व्यवस्थापन पद्धतीत सामावून घेण्यात येत आहे.

शहरांतील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी नगर विकास मंत्रालयाने २०१४ मधे स्वच्छ सर्वेक्षणाची सुरवात केली होती. या अंतर्गत स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविले जात आहे.नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि लहान तसेच मोठी शहरे यांना अधिक राहाण्यायोग्य बनविण्याच्या दिशेने सर्वानी एकत्रित काम करणे याविषयी समाजाच्या सर्व घटकांमध्ये जनजागृती करणे हे या सर्वेक्षणाचे उद्दीष्ट आहे.
शहरात महानगरपालिका कर्मचाऱ्यांव्यतिरिक्तही काही माणसे,महिला,लहान मुले कचरा उचलताना आपल्याला दिसतात.अनौपचारिकरीत्या कचरा उचलणाऱ्या या व्यक्ती आपल्या रोजंदारीसाठी हे कार्य करीत असतात.सरकारच्या कुठल्याही स्वच्छता विभागाशी  त्यांचा संबंध नसतो.मात्र या व्यक्ती स्वच्छतेबाबत समाजात महत्वाची भूमिका बजावीत असतात.सरकारी विभागाचे अधिकृत कर्मचारी नसूनही त्यांच्याकडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या स्वच्छतेचे कार्य होत असते.स्वच्छतेसाठी हातभार लावणाऱ्या त्यांच्या या कार्याला अधिकृत दर्जा मिळवून देण्यासाठी महानगरपालिकेने २०१६ पासून त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.दरवर्षी नुतनीकरण केल्या जाणाऱ्या अधिकृत ओळखपत्राने त्यांच्या या कार्याला दर्जा तर प्राप्त झालाच आहे,शिवाय त्यांच्याकडून समाजाप्रती केल्या जाणाऱ्या योगदानाला सन्मान प्राप्त झाला आहे.स्वच्छता मोहिमेत नागरिकांना सामावून घेण्याचा मनपाचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.  या असंघटीत कचरा वेचकांकडूनजमा होणारया कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया होत नाही.या कचऱ्यात अनेकदा प्लास्टिक,इ-वेस्ट जसे मोबाइल,बॅटरी,कॉम्पुटर,इत्यादींचा समावेश असतो. यामुळे या कचऱ्याचे अशास्त्रीय पद्धतीने केलेली प्रक्रिया पर्यावरणीय दृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण करते. या दृष्टीने हा कचरा शास्त्रीयदृष्ट्या प्रक्रिया होण्यासाठी असंघटित क्षेत्रातील स्वच्छता सेवकांना ओळखपत्र  देण्यात आले.
तसेच घटक स्वरूपाचा कचरा गोळा करतांना त्यांना त्रास व इजा होऊ नये म्हणून भविष्यात या कचरावेचकानाही मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे सुरक्षा प्रावरणे देण्याचा मनपाचा प्रयत्न असेल.   

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.