https://www.khabarbat.in/2023/05/shankarpat-bailgada.html |
बैलगाडा - शंकरपटासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
राज्यात बैलगाडा शर्यतींचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. दरम्यान राज्यातील बैलगाडा शर्यतींचे भवितव्य आज १८ मे रोजी ठरले. कारण सर्वोच्च न्यायालय तामिळनाडूतील जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रतील बैलगाडा शर्यतींना परवानगी देणाऱ्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आपला निकाल दिला आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी दिली आहे. (Shankarpat Bailgada- bailgada sharyat)
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार कायदा व नियम यामधील तरतुदीनुसार महाराष्ट्रातील संस्कृती आणि परंपरेनुसार साजरा करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आजार परवानगी देण्यात येणार आहे. कोणत्याही राजकीय कार्यक्रम, नेत्याचे वाढदिवस व इतर प्रसंगी बैलगाडी शर्यती परवानगी देण्यात येणार नाही. यामध्ये पशु व संवर्धन विभागाने बैलगाडा शर्यत शंकरपट, छकडी आदी प्रकारच्या १००० मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या बैलगाडी शर्यतीस परवानगी आहे. राज्यात अनधिकृतपणे आयोजित करण्यात येणाऱ्या आरपारत, बैल घोडा, लाकूड ओंढका ओडणे, चिखलगुट्टा समुद्रकिनाऱ्यावरील शर्यती टक्कर व 1000 मीटर पेक्षा जास्त अंतराच्या बैलगाडी शर्यतीस 24 मे रोजी प्रतिबंध घालण्यात आला आहे. याशिवाय अनेक नियम व अटी पशुसंवर्धन विभागाने घालून दिलेले आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यत किंवा शंकरपट आयोजकांनी खालील लिंक वर जाऊन नियमावली वाचून घ्यावी.
राज्यातील बैलगाडी शर्यती आयोजीत करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
https://ahd.maharashtra.gov.in/pdf/SOP_to_organize_Bullock_cart_races_in_State_compressed.pdf
बैलगाडा शर्यती आणि जल्लीकट्टू यांच्या परवानगीबाबत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल काय असेल याकडे या लक्ष होते. bailgada sharyat या प्रकरणावर घटनापीठाने सुनावणी करून निकाल राखीव ठेवला होता. तामिळनाडूतील जालिकट्टू, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत नेमकं काय होणार याबद्दल उत्सुकता होती.
Supreme Court to pronounce its judgement tomorrow, May 18 on a batch of petitions challenging Tamil Nadu and Maharashtra governments’ laws allowing bull-taming sport “Jallikattu” and bullock cart races.
राज्यात बैलगाडा शर्यतीवर राज्यात बंदी घालण्यात आली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर या शर्यतींबद्दल अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्यात आले होती. याप्रकरणातील सुनावणी घटनापीठापुढे पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालय यावर निकाल दिला आहे. Shankarpat Bailgada
प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यात राज्याने केलेल्या सुधारणा लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने १६ डिसेंबरला महाराष्ट्रात बैलगाडी शर्यती bailgada sharyat पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
२०१४ मध्ये बैलगाडा शर्यतीला बंदी bailgada sharyat
बैलाचा समावेश राजपत्रात केल्यानंतर मे २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. परंतु त्यानंतर महाराष्ट्राप्रमाणे तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये देखील काही प्राणीप्रेमींनी बैलगाडा शर्यतबंदीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
भारतातील इतर राज्यांतील प्राणी खेळ
१) जल्लीकट्टू : तमिळनाडू बैल पकडण्याचा खेळ; पोंगल सणाच्यावेळी खेळला जातो.
२) कंबाला : कर्नाटक चिखलात भरलेल्या भाताच्या शेतात खेळली जाणारी म्हशींची शर्यत
३) कोंबडा – मारामारी :जगभरात खेळला जातो; स्वदेशी खेळ नाही.
४) उंटांची शर्यत राजस्थान पुष्कर फेअर, बिकानेर कॅमल फेस्टिव्हल
५) बुलबुल मारामारी आसाम बिहू उत्सवाच्यावेळी आयोजन
६) घोडदौड देशात कायदेशीर मान्यता, भारतातील २०० वर्षांहून अधिक काळ प्रचलित असलेला खेळ