Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०८, २०२३

निवडणुकांसाठी भाजपाच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा |

bjp

लोकसभाविधानसभा निवडणुकांसाठी भाजपाचे निवडणूक प्रमुख जाहीर

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

 

    पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपा - शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ‘’महाविजय अभियान २४’’ चे प्रदेश संयोजक आ. श्रीकांत भारतीय,  महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आ. प्रवीण दरेकरप्रदेश सरचिटणीस विजय चौधरीविक्रांत पाटीलमुख्य प्रवक्ते केशव उपाध्येमाध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.           

   श्री. बावनकुळे यांनी सांगितले कीभारतीय जनता पार्टीने नियुक्त केलेले निवडणूक प्रमुख भाजपा बरोबरच शिवसेनेच्या उमेदवारांनाही सहकार्य करणार आहेत. आगामी सर्व निवडणुका युतीत लढविणार असल्याने आमचे निवडणूक प्रमुख शिवसेनेसाठीही काम करणार आहेत.

   मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे सध्या सुरु असलेल्या महाजनसंपर्क अभियानात नांदेड येथे १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही राज्यात सभा होणार आहे. या अभियानात मोदी सरकारची कामगिरी सामान्य माणसापर्यंत पोहचविली जाणार आहे. या अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. या अभियानात घरोघरी जाऊन मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरित केली जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. याच अभियानात टिफिन बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपूर येथे व आपण अक्कलकोट येथे टिफिन बैठकीला उपस्थित होतोअसेही श्री.बावनकुळे यांनी नमूद केले.

  बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आ. राहुल कुल,  पुण्यासाठी मुरलीधर मोहोळमुंबई उत्तर साठी आ. योगेश सागरमावळ साठी आ. प्रशांत ठाकूर आदींची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.  




#bjp #india #narendramodi #modi #congress #amitshah #rss #hindu #politics #rahulgandhi #yogiadityanath #delhi #indian #bjpindia #namo #hinduism #news #hindutva #indianpolitics #bhfyp #covid #hindustan #mumbai #bharat #instagram #yogi #godimedia #memes #maharashtra #sanatandharma

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.