Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जून १०, २०२३

शरद पवारांकडून देवेंद्रजींना बदनाम करण्याचे काम : चंद्रशेखर बावनकुळे #9YearsOfSeva @AmitShah

शरद पवारांकडून देवेंद्रजींना बदनाम करण्याचे काम : चंद्रशेखर बावनकुळे 

राजेशाही थाटामध्ये चालणाऱ्या लोकांना आता रस्त्यावर आणलेला आहे आणि पवार साहेबांचा पोवाडा संपला. आज त्यांचा वर्धापन दिवस आहे. पण वर्धापन दिवस कशाचा आहे? ज्या पक्षाचं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता संपली, त्या पक्षाचा वर्धापन दिवस आहे आणि आत्ता शरद पवार साहेबांनी देवेंद्रजींना बदनाम करण्याचे काम चालू केले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. 

मोदी जी के नेतृत्व में देश में चौतरफा विकास हो रहा है। गरीबों के सशक्तीकरण से लेकर युवाओं के लिए अनेक क्षेत्रों की राहें खुली हैं जिससे राष्ट्र निर्माण में उनकी भागीदारी बढ़ रही है। आज गुजरात के पाटन में मोदी सरकार के 9 वर्ष पूरे होने पर जनता से संवाद किया। #9YearsOfSeva


केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमितभाई शाह यांचे नांदेड विमानतळावर आगमनाप्रसंगी मन:पूर्वक स्वागत केले. ‘मोदी @ ९’ जनसभेतून महाराष्ट्राला संबोधित करण्यासाठी त्यांचे आगमन झाले.

#9YearsOfSeva #AmitShah #Nanded #Maharashtra


देशातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महाजनसंपर्क अभियानाचा शुभारंभ अमित शाह यांच्या जाहीर सभेने झालं. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.  

 केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह शनिवारी दुपारी नांदेड येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनीही त्यांचे स्वागत केले.


 यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार प्रतापराव चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार राम रातोळीकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार भिमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार श्यामसुंदर शिंदे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. एस. एम. महावरकर, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, मनपा आयुक्त महेश डोईफोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



 चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृहमंत्री अमित भाई शहा यांचा उल्लेख आधुनिक भारताचे लोहपुरुष असा केला.  आजपासून पुन्हा एकदा या सरकार जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या तीन कोटी घरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प आपल्याला या ठिकाणी आपल्याला करायचा आहे,  खरं तर आपल्याला माननीय पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कामगिरीचा आपण पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून आपला अभिनंदन केलं पाहिजे. नऊ साल मे मोदी जी ने किया हुआ काम इनका अभिनंदन होना चाहिए एक बार जोरदार टाली बजाके मोदीजींच्या कामाचा अभिनंदन करूया असे ते म्हणाले. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014 आणि 2019 मध्ये जो जाहीरनामा माननीय अमित भाई आपने अध्यक्ष होने के समय दिया था क्या जाहीरनामापेक्षा जास्त काम या देशामध्ये झाली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आपल्याला अभिमान आहे खरं तर सेवाच विचारसरणी गरीब कल्याण हा नारा हा आहे. पाच जूनला तीन मूर्ती भवन मध्ये मोदी सरकारच्या कामाचं अमृत काल की ओर या पुस्तकाचे विमोचन झालं. माननीय अमित भाई आपने इस पुस्तक मे जो प्रस्तावना की है जो प्रस्तावना दिये वो हमारे प्रेरणादायक है. हा महाराष्ट्र बदलतोय कधी आपण समृद्धी महामार्गाची संकल्प केलेला माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाटतं एक कमळाचे मत किती महत्त्वाचा आहे. एक कमळाचे मत आपण मत कुणाला देतो पण एक कमळाचे मत देश बदलू शकतो एक कमळ मत महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला दाखवला आहे. 

औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशिव आणि परवा अहमदनगरला अहिल्या नगरचे नाव देण्यात आले. शरद पवार साहेब, अजित पवार  कहा है हम कभी भी संभाजीनगर नही कहेंगे हम औरंगाबाद कहेगे. शरद पवार साहेब प्रकार की बाते है इस महाराष्ट्र हो रही है महाराष्ट्र राजकारण, महाराष्ट्र राजनीती को दंगे मे बदलने का काम विरोधी पार्टी करीतआहे , असा आरोप केला. 

#9YearsOfSeva  #AmitShah #Nanded #Maharashtra


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.