अमरावती, नागपूर, यवतमाळ ,भंडारा, वर्धा येथे तुरळ ठिकाणी आगामी काही तसेच कडकडाटसह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरीही अनेक जिल्ह्यात मान्सुन पाऊस बरसत आहे, तर पूर्व विधार्भात देखील आज ढगाळ वातावरण राहून भंडारा जिल्ह्यात #पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता.
एक आठवड्याच्या विलंबानंतर मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल (Monsoon Arrives in Kerala) झाला असून, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे.
८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशात सक्रिय होणार आहे. आज ८ जून रोजी विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे होते. नऊ जून रोजी विदर्भामध्ये अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दहा जून रोजी अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली मध्ये ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
नऊ जून रोजी अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी विज कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे. दहा जून अमरावती, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया मध्ये विजांच्या कडकडाट आणि सोसाट्याचा वारा ताशी 30 ते 40 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस कमाल तापमानात मोठी वाढ होणार नाही.
मॉन्सूनची केरळमध्ये दाखल होण्याची नेहमीची तारीख एक जून अशी असते. मात्र, यंदा एल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून बंगालच्या उपसागरातही मॉन्सून चार दिवस उशिरानेच दाखल झाला होता. मात्र त्यानंतर आलेल्या बिपोरजॉय या चक्रीवादळामुळे त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण झाला होता. अखेर गुरुवारी मॉन्सून केरळमध्ये सात दिवसांच्या उशीराने दाखल झाला.