छ. शिवाजी महाराजांचे चित्र
फेसबुक लिंक http://bit.ly/3u0W4BN
सदर चित्र हे थोर इतिहास संशोधक आणि संपादक, द. ब. पारसनिसांचे सहकारी आणि ऐतिहासिक वस्तुंचे संग्राहक पुरुषोत्तम विश्राम मावजी यांच्या संग्रहातील असून मूळ चित्र मावजींच्या सातारा येथील संग्रहात होते. पुढे मावजींनी ते मुंबईच्या तत्कालीन 'प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिअम' अथवा सध्याच्या 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया'ला भेट म्हणून दिले. काही वर्षापूर्वीपर्यंत सदर चित्र हे दर्शनी पहावयास ठेवले होते. परंतू या चित्राच्या सद्य स्थितीतील अवस्थेतून पुनर्जिवित करण्याच्या हेतूने ते सध्या प्रदर्शनास नाही. सदर चित्राच्या कॉपीज् संग्रहालयाच्या विक्रिकक्षात मूल्य रु ५० ला विक्रिसाठी उपलब्ध आहेत.
सदर चित्र दख्खनी चित्रशैलीतील असून महाराजांच्या उजव्या हातात फिरंग / धोप जातीची सरळ पात्याची तलवार आणि डाव्या हातात पट्टा आहे. कमारेला शेल्यात कट्यार खोवलेली असून वर्ण सावळा दाखवला आहे. एकंदरित चित्रशैली पाहताना हे चित्र समकालीन असण्याची दाट शक्यता आहे. चित्रकाराचे नाव उपलब्ध नाही. चित्रकाराने आपली जान चित्रात आोतलेली असुन सर्वांगसुंदर हे चित्र आहे.