चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार खात्याची मागील 10 वर्षात घडलेल्या अनेक गंभीर तक्रारी लपवून मिळवलेल्या 360 पदाची नोकर भरतीबाबत सत्यता शासनाकडे खासदार व आमदार यांनी पाठपुरावा करून सत्यता निदर्शनास आणून दिल्याने 12 मे 2022 ला सहकार विभागाने स्थगीती दिली होती. त्यावर 23 नोव्हेंबर रोजी स्थगिती उठविण्यात आली होती. मात्र, 29 नोव्हेंबर रोजी सुधारित आदेश निघाले असून, स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
2017 ला विहित कार्यकाळ संपल्यानंतर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे न टाळता नोकर भरती, अमाप व अवास्तव खरेदीवर खर्च, मानधनावर लपून छपून भरती, निवृत्त अधिकारी यांना मानधनावर नेमणूक विम्यावर खर्च, अव्यवहार्य पोटनियम दुरुस्ती, शेतकरी कल्याण निधीचा गैरवापर, मुख्य कार्यकारी अधिकारी याची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, सहकार खाते चे फिट अॅड प्रॉपर क्राईटरिया नियमात न बसणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करून गंभीर गुन्हे लपवून केंद्र व राज्य सरकारची दिशाभुल इत्यादी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची खासदार श्री बाळूभाऊ धानोरकर व आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर यानी शासन दरबारी लावून धरली. काही निवडक मंडळींनी सहकार खात्याची वर नमुद बाबी दडपून बँकेच्या रक्कमेची उधळपट्टी करीत होते. खासदार व आमदार यांचे जागरूप भूमिकेने स्वप्नभंग झालेला आहे.
खासदार बाळुभाऊ धानोरकर व आमदार सौ. प्रतिभा धानोरकर यांनी बँकेतील काळजीवाहू संचालक मंडळ करीत असलेल्या गैरकृत्य पुराव्यासह आळा घालण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत.
अनेक गंभीर गैरप्रकार रोखण्यासाठी काही संचालकांनी खासदार यांचेशी संपर्क साधुन पुरावे दिल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष काही संचालक व अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Finally, the dream of Chandrapur District Central Co-operative Bank recruitment failed