Watch video on YouTube here: https://youtu.be/_NH1dNo2vx8
*जिवतीच्या महिलांच्या मागणीने राज्यातील सव्वादोन लाख कुटुंबांना दिलासा*
*साहेब, तुम्ही आमच्यासाठी विघ्नहर्ता आहात!*
*दुर्गम भागातील महिलांचे बोल ठरले खरे!*
"श्री गणेशा हा सर्व भक्तांसाठी विघ्नहर्ता आहे. आपल्या भक्तांचे दुःख तो दूर करतो. साहेब, तुम्ही आमच्यासाठी विघ्नहर्ता आहात!", असे भावनिक उद्गार निवेदन घेऊन आलेल्या पीडित महिलांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती व्यक्त केले. या उद्गगाराची अनुभूती तीन चार दिवसांमध्येच आली. सुधीरभाऊंच्या आग्रहाखातर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. इतकेच नव्हे तर सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका देखील दाखल करणार आहे. जिवतीच्या महिलांनी केलेली ही मागणी राज्यातील राज्यात दोन लाख 22 हजार 382 व्यक्तींना दिलासा देणारी ठरली आहे.
याच आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम असलेल्या जिवती, कोरपना तालुक्याच्या दौऱ्यावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. यावेळी मंत्री महोदयांनी दूरवरून आलेल्या महिलांच्या समस्या आणि अडचणी आस्थेनं समजून घेत त्या सोडवण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी या महिलांनी गावरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडून तगादा लावण्यात येत आहे आणि भविष्यात घरे आणि जागा नसल्याने जायचे कुठे? असा प्रश्न मांडला. तेव्हा सुधीरभाऊंनी हा प्रश्न गांभीर्याने घेत त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. घाबरून जाऊ नका, तुमच्या जमिनी कोणीही हिरावून येणार नाही, असे शब्द दिल्यानंतर मोठ्या अपेक्षनं आलेल्या या महिलांनी सुधीरभाऊंना "तुम्ही विघ्नहर्ता आहात" अशी प्रशंसा केली.
दिलेला शब्द पूर्ण करायचा हे ब्रिद सुधीर भाऊंच्या जीवनात कायम आहे. त्याचा प्रत्यय वेळॊवेळी चंद्रपूर जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना आलेला आहे. आज जिवती, कोरपना येथील महिलांच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील गावरान जमिनीवरील हा प्रश्न झटक्यात मार्गी लागला आहे.