Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २५, २०२३

एन.एस.डी.सी दिल्लीमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभागी 
होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर:
 भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दि. 21 फेब्रुवारी ते 26 मे 2023 या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली (एनएसडीसी) यांच्यामार्फत आयोजीत करण्यात आला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवार, उद्योजकांना सहभागी होण्याकरीता लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या जॉब फेअरमध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/ या लिंकवर नोंदणी करावयाची आहे. तसेच विविध कंपन्या व उद्योजकांना सहभागी होण्यासाठी www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/ ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून या लिंकवर नोंदणी करावयाची आहे.

रोजगार मेळावा ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्या करीता उमेदवारांना एन.एस.डी.सी.च्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये उमेदवारांची प्राथमिक फेरी व अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमसुद्धा आयोजीत करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होणा-या उद्योजकातर्फे प्राथमिक व अंतिम फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमाकरीता संबंधित उद्योजक प्रत्यक्ष हजर राहणार आहे. वेगवेगळया झोनमध्ये वेगवेगळया दिवशी प्राथमिक आणि अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लड, युरोप, पश्चिम आणि दक्षिण आशिया, जपान, आस्ट्रेलिया, न्युझिलंड, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया व भारतातील नामांकित उद्योजक ऑनलाइन उपस्थित राहणार आहे. यामध्ये ऑटोमोटीव्ह, कृषी, कारपेंटर, बांधकाम, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशिअन, फॅसिलीटी मॅनेजमेंट, फूड आणि बेव्हरेज, हेल्थ केअर, हॉस्पीटॅलीटी, आयटी, लॉजीस्टीक, ऑइल ॲड गॅस, प्लंबर, रेफ्रिरेजेशन, रिटेल सर्व्हिस, शिपयार्ड, वेल्डर आदी क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवारांकरीता महाराष्ट्रात मुंबई येथे प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

जॉब फेअरची प्रक्रिया व कालावधी
स्क्रीनिंग व भाषा चाचणीचा ऑनलाइन दिनांक 20 ते 27 मार्च 2023, उमेदवाराची ऑनलाइन मॅपिंग दि. 28 मार्च ते 10 एप्रिल 2023, तर भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फे-या दि. 11 ते 30 एप्रिल 2023, संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फे-या दि. 8 ते 15 मे 2023 कालावधीत पार पडणार आहे. समारोपीय समारंभ दि.26 मे 2023 रोजी होणार आहे. या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून किमान 2 हजार उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी प्राप्त करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

निवड झालेल्या उमेदवारांचे परदेशात प्रस्थानापूर्वी आवश्यक प्रशिक्षण एन.एस.डी.सी.मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीकरीता एनएसडीसीच्या व्यवस्थापक पंघोरी बोरगोएन यांच्या 9599495296 भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा pangkhuri.borgohain@nsdcindia.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.