Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २९, २०१९

तीन दिवसात तोडगा न काढल्यास चंद्रपूर मनपाचे सार्वजनिक शौचालय बंद

चंद्रपूर/प्रतिनिधी:                

चंद्रपुर येथील भिवापूर वार्ड सुपरमार्केट महाकाली चौकी मागे असलेल्या मनपाच्या सुलभ शौचालयाच्या सांडपाण्याचे योग्य नियोजन न केल्याने चंद्रपूर मनपावर सध्या भिवापूर वासियांचा रोष दिसू लागला आहे. 

चंद्रपुर भिवापूर वार्ड सुपरमार्केट महाकाली चौकी मागे असलेल्या सुलभ शौचालय मधून घान सांडपाणी थेट नाली बाहेर सोडल्या जात असल्याने परिसरातील नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.येत्या ३ तिन दिवसात सांडपाण्याचे योग्य नियोजन करा अन्यथा आम्ही परिसरातील नागरिक या सार्वजनिक शौचालयाला कुलूप ठोकू असा इशारा नागरिकांनी मनपाला दिला.प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे स्वच्छ भारत अभियानचा फज्जा उडतांना दिसत आहे.

यामुळे यापरीसरात राहणाऱ्या लोकात प्रचंड रोष आहे, परिसरातील नागरिकांनी वारंवार या संदर्भात तक्रारी महानगरपालिकेला व नगरसेवकांना केल्या मात्र महानगरपालिकेकडून व संबंधित विभागाकडून काहीच दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी तीन दिवसांत तोडगा काढा असा इशारा मनपाला दिला आहे.

विशेष म्हणजे मार्केट लाईन असल्याने हे सुलभ शौचालय या परिसरात आवश्यक होते. व बनवितांना या बाबदचे निवेदन शौचालय बनण्यापुरवी स्थानीक नागरीकानी मनपा प्रशासनाला दिली होती. मात्र मालसुताव कंत्राटदारानी जुन्याच कामांची डागडुगी करून हा शौचालय निकृष्ट दर्जाचे बनवला असा आरोप नागरिकांचा आहे. 

तसेच याप्रभागातील नगरसेवक यांनी देखील आमच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असा आरोप येथील नागरिक दिप्ती मुसनवार, संगिता येंगदलवार. चंदा विश्वकर्मा, मिना, विश्वकर्मा, निर्मला देहरे, गणेश नगराळे, यांनी केला आहे, त्यामुळे उदासीन लोकप्रतिनिधींची उदासीनता शहराच्या विकासाला खिळ देत आहे, असे या उदाहरणावरून दिसू लागले आहे, या ३ दिवसाच्या इशाऱ्या नंतर मनपा प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.