Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी १४, २०२३

कालीमाती येथे १७ फेब्रुवारी ला भव्य खंजेरी भजन स्पर्धा | १८ ला महाप्रसाद




संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.१४ फेब्रुवारी:-

श्री गणेश सत्संग भजन मंडळ कवठा, जय कोकणाई माता महिला भजन मंडळ कवठा,कालीमाती हनुमान मंदिर देवस्थान समिती सुकळी खैरी, ग्रामपंचायत गोठणगाव, प्रतापगड, बाराभाटी, कुंभीटोला, देवलगाव,कवठा,येरंडी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दिनांक १७ फेब्रुवारी रोज शुक्रवारला सायंकाळी ७.०० वाजता हनुमान मंदिर कालीमाती परिसर येथे भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांच्या शुभहस्ते होणार असून,माजी जिल्हा परिषद सदस्य व खोडशिवनी ग्रामपंचायतचे सरपंच गंगाधर परशुरामकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत प्रथम क्रमांक दहा हजार रुपये, द्वितीय क्रमांक सात हजार रुपये, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये रोख विजेत्या मंडळांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. 

तसेच पुरुष महिला गायक तबलावादक हार्मोनियम वादक यांच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. पुजारी केवळराम कांबळे व कवठा पोलीस हरिचंद मेश्राम यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या भव्य खंजिरी भजन स्पर्धेला भजन मंडळांनी व भक्तांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजका च्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.