*कामठी*:सिंधुताई सपकाळ महिला महाविद्यालय, बडेगाव व राम लक्ष्मी प्रतिष्ठान पिंपळा (डाग बंगला) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण व सामाजिक क्षेत्रांत दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार कामठी येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक राम हरीभाऊ बुटके यांना नुकताच पिपळा डाग बंगला येथील राज लक्ष्मी सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे, प्रफुल्ल शिंदे, डॉ. चंदू पाटील, सुभाष ठेंगरे, राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा. राम हरीभाऊ बुटके यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रा. राम हरीभाऊ बुटके यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजकार्य महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी, प्राध्यापक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ. मनोज होले, प्रा. आवेशखर्णी शेख, प्रा. राहुल जुनगरी, डॉ. हर्षल गजभिये, प्रा. गिरीश आत्राम आदींनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. राम हरीभाऊ बुटके यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.