Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २७, २०२२

हत्तींच्या कळपाने वळविला मोर्चा; पिकांचे प्रचंड नुकसान

रात्रभर हत्यांनी केली धान पुंजण्याची नुकसान. 
परिसरात प्रचंड दहशत

दाभना,पिंपळगाव,खांबी,बाकटी,परिसरात  भागी बोरटोला,येथे सध्या बसले ठाण मांडून

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध:- दि.२७ नोव्हेंबर.

नवेगावबांध,अर्जुनी मोर या दोन वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कवठा,खैरी,सुकळी, कुंभीटोला,येरंडीदरे, रामघाट या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून वावर असलेल्या हत्तीच्या कळपाने आपला मोर्चा बाराभाटी रेल्वे क्रॉसिंग ओलांडून अरततोंडी,दाभना, पिंपळगाव,खांबी,इंजोरी परिसरात काल( दिनांक 26 नोव्हेंबर) रोज शनिवारला रात्रीच्या सुमारास वळविला या गावातील धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. त्यामुळे पिंपळगाव,खांबी परिसरातील तोंडाशी आलेला व व व रोगराईतून सावरलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाली असून शेतकऱ्यांचा तोंडचाचा घास हत्तींनी हिरावून घेतला आहे.
गेल्या 28 सप्टेंबर पासून गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्याच्या कळपाने प्रवेश केला होता. तेव्हाही
तेव्हाही सुकळी,कवठा येथील शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान हत्तींनी केली होती. 4 ऑक्टोंबर ला मौजा तिडका येथील एका शेतकऱ्याला एका हत्तीने चिरडल्यामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला होता.तर एक शेतकरी जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा या हत्यांचा मोर्चा कवठा,बोळदे, खैरी सुकळी कवठा कुंभी टोला कवठा,बोळदे या गावांकडे गेल्या पंधरा दिवसापासून पुन्हा वळविला आहे. कळपाने शेतकऱ्यांच्या धानपिकांचे शेतात रात्रभर धुळघुस घालून प्रचंड प्रमाणावर नासधूस केली होती. पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.
आता पुन्हा काल रात्री पासून गुढरी,सोमलपूर ,बाकटी,चांना परिसरातून सकाळच्या सुमारास आपला मोर्चा बोरटोला,सावरटोला लगत च्या भागी पहाडी परिसरात हत्ती ठाण मांडून बसले आहेत. वन विभागाचे नवेगावबांध,अर्जुनी मोरगाव, गोठणगाव वनक्षेत्रातील जवळपास 100 अधिकारी , कर्मचारी व पश्चिम बंगाल वरून पाचारण करण्यात आलेले होला टीमचे 50 सदस्य हत्तींच्या कळपावर नियंत्रण ठेवून आहेत. वनविभागाच्या वतीने कुठलीही मनुष्य जीवित हानी होऊ नये,हत्तींच्या कळप गावात प्रवेश करू नये, गावातील मनुष्यहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकडे वन विभाग विशेषत्वाने लक्ष ठेवून आहे. गेल्या महिना, दीड महिन्यापूर्वी कवठा,बोळदे ,खैरी,सुकळी,एरंडी दर्रे या परिसरात थैमान घालून शेतशिवारात रानटी हत्यांच्या कळपाणे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान केले होते. मागील महिन्यात नागणडोह येथे हत्तींनी हैदोस घालून गावातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. गावकऱ्यांना रात्रीच गावातून जीवमुठीत घेऊन, भयाण अंधारात पळून जाऊन गाव सोडावे लागले होते. तर येरंडी दर्रे येथील येथील एका शेतकऱ्याला जीव गमवा लागला होता, तर एक शेतकरी जखमी झाला होता. हे येथे उल्लेखनीय आहे. कवठा, बोळदे खैरी,सुकळी, कुंभिटोला परिसरात हत्ती वास्तव्याला असताना,गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी या परिसराला दि.२२नोव्हेंबर ला भेट दिली होती. हे येथे उल्लेखनीय आहे.
आधीच इतर वन्यप्राणी केलेल्या व आता हत्तींचा कळपाने शेत पिकाचे नुकसान केले होते. परंतु नुकसानीच्या मानाने वन विभागाकडून मिळणारी मदत ही फारच अल्प असून त्यामध्ये तिप्पट वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे.त्याचप्रमाणे ज्यांचे सतत तीन-चार वर्षांपासून नुकसान होत आहे व आतापर्यंत ज्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.अशा शेतकऱ्यांना प्राधान्य क्रमाने मदत देऊन तात्काळ उपाययोजना करावी. अशी मागणी पिंपळगाव,खांबी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान हत्तीच्या कळपाणे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान केलेले आहे. हत्तीचा वावर असलेल्या परिसरात या हत्तीच्या कळपांची धास्ती व भीती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे.रात्रीच्या वेळी सदर हत्तीचा कळप गावांमध्ये येऊन जीवितहानी व वित्तहानी करणार नाही ना?या दहशतीत परिसरातील संपूर्ण गावातील लोक आहेत.तर वन विभागाकडून रात्रीची गस्त लावून त्यांच्यावर पाळत ठेवत आहेत. हत्तीना गावापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रात्रंदिवस हत्तींच्या कळपावर नजर ठेवून, वन विभाग करीत आहे. हत्तीचा कळप परत कवठा बोळदे खैरी सुकळी कुंभिटोला या परिसरात सध्या वास्तव्यात असलेले हत्तींचा कळप परत येणार? की भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्याकडे आपला मोर्चा वळवणार? याकडे परिसरातील जनतेचे वनविभागाचे लक्ष लागले आहे.


हत्तींनी गावात प्रवेश करू नये, गावातील जीवित हानी,वित्तहानी होऊ नये.याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. हत्तींना नियंत्रित करण्यासाठी होला पथक कलकत्ता येथून पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्या हालचालीवर वन विभाग बारीक लक्ष ठेवून आहे.
-रोशन दोनोडे, वनपरिक्षेत्राधिकारी, वनक्षेत्र नवेगावबांध.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.