संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१३ ऑक्टोबर:-
काल रात्री नागणडोह गावामध्ये हत्तीचा कळप घुसून घरांची तोडफोड केलेली आहे. गावामध्ये अंदाजे 40 ते 45 लोकांची लोकवस्ती असून 8 ते 9 घरे आहेत. कोणतीही जीवित हानी झालेली नाही, जीवनावश्यक वस्तू व घराचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच हत्ती गावामध्ये आल्यानंतर सर्व लोक सुखरूपरीत्या जवळच्या तिरखुरी गावांमध्ये मार्गस्थ झाल्याची माहिती मिळते. गोठणगाव वनपरिक्षेत्राचा स्टाफ, RRT यांनी मौकास्थळी जाऊन पाहणी केली. नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
elephants | Nagandoh village | Tirkhuri villages| Gothangaon Forest Range | RRT
सध्या हत्तीचा कळप नागणडोह चे परिसरात असल्याची खात्री केली आहे.
यापूर्वी सुकळी कवठा बोळदे,जब्बारखेड,तिडीका या परिसरात हत्याने हैदोस मांडला होता 3 ऑक्टोबरला तिडका येथील सुरेंद्र जेटु कळहबाग या शेतकऱ्याने जीव गमावला होता तर एक शेतकरी जखमी झाला होता गेल्या पंधरा दिवसापासून याच परिसरात हत्तींचा वावर असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे वन विभागामार्फत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे केले जात असून नुकसान भरपाई देण्याची तजवीज केली जाईल असे वन अधीकाऱ्यांकडून सांगण्यात येते आहे 7 ऑक्टोबरला हे हत्ती पुन्हा कवठा परिसरात आले होते.त्यानंतर नवेगावबांध, कोहलगाव या परिसरात काल परवा दोन दिवस वास्तव्य होते. नागनडोह गावात अचानक हत्तींचा कळप आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. सैरावैरा पळू लागले. जीवाच्या आकांताने गावकरी महिला-पुरुष आपले मुलेबाळे घेऊन तीरखुरी गावाकडे पळून गेले. हत्तींच्या पाळतीवर असलेल्या वनविभागाच्या वनरक्षक,वनमजूर यांनी आज सकाळी सर्व नागनडोहवासीयांना बोरटोल्याला हत्तीचे वास्तव्य असेपर्यंत राहण्याची व्यवस्था केली आहे. सुदैवाने मात्र कुठलीही जीवित व प्राणहानी झाली नाही.
नागणडोह मधील सर्व लोकांना वनविभागाचे मदतीने बोरटोला येथे हत्तीचे अस्तित्व असेपर्यंत हलविण्यात आले असून, राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नागणडोह येथे केलेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई देण्याची तजवीज ठेवण्यात येत आहे.
श्री. दादा राऊत,
सहाय्यक वनसंरक्षक, नवेगावबांध.
elephants | Nagandoh village | Tirkhuri villages| Gothangaon Forest Range | RRT visited the spot and inspected.