संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ जानेवारी:-
आपले गाव आपला परिसर हा ग्रामीण क्षेत्रात मोडतो. या भागातील शाश्वत विकासाचे प्रयत्न करून, विज्ञान व तंत्रज्ञान च्या ज्ञानावर आधारित काय उपक्रम ग्रामीण संसाधनावर उभारता येतील?हे केंद्रबिंदू मानून,येथील कमल गोविंद युनायटेड वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित आरुषी पब्लिक स्कूल येथे,आरुषी पब्लिक स्कूल व अमित ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक संशोधनाचे बीज विद्यार्थ्यांच्या अंतकरणात शालेय जीवनापासूनच रुजावे या उद्देशाने एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन येथिल प्रतिष्ठित व्यापारी कमल जायस्वाल यांच्या शुभहस्ते,संस्थेचे सचिव एकनाथ बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून,पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, ग्रामपंचायत सदस्य बबलू जैन,नीता जायस्वाल,डॉ.भोयर, कविता शिपानी,भोयर मॅडम, मुख्याध्यापक रमेश नाकाडे,संजीव बडोले,रामदास बोरकर,डॉ.युगा कापगते, खुशाल काशिवार,महादेव बोरकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, मराठा सेवा संघाचे सुनील तरोणे, गोविंदा बोरकर,प्रशांत कापगते, संजय पुस्तोडे, प्राचार्य तिरुपती मेश्राम,राणे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते, भारताचे पूर्व राष्ट्रपती व मिसाईल मॅन, वैज्ञानिक डॉ.एपीजे अब्दुल कलाम व शारदा माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, लोप झालेल्या व लोप होऊ पहात आहेत असे पारंपारिक बी-बियाणे,स्वस्त ऊर्जा,पवन ऊर्जा, अंतराळ,भौगोलिक ज्ञान, शेतीला सिंचन, शेतकऱ्यांना उद्योजक बनवता येइल असे कृषी विषयावर आधारित विविध असे १४ प्रकल्पाचे सादरीकरण या विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात आले. प्रदर्शनात आलेल्या दर्शकांना विद्यार्थ्यांनी माहिती देऊन,त्यांच्या शंका समाधान केले. शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी सदैव स्वागत करून, स्वतःमध्ये वैज्ञानिक संशोधनाची बीजे शालेय दशे पासूनच अंकुरावी.अशी अपेक्षा व्यक्त करून, उद्याचा भारत आपल्याच खांद्यावर आहे.त्यामुळे जबाबदारीची जाणीव ठेवून भारताच्या सर्वांगीण विकास कसा होईल,याकडे लक्ष द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त करून, प्रदर्शनात सादर केलेल्या शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची अतिथींनी प्रशंशा केली. विद्यार्थ्यांनी तेवढ्यात जोमात अतिथींच्या या अपेक्षेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन अमित बोरकर यांनी केले,तर उपस्थितांचे आभार पोरस ठाकूर यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी प्रवीण तिरपुडे,महेश लांजेवार,गौतम शेंडे,विक्की बावनकुळे, नारायण डुंबरे ,अश्वघोष रामटेके,द्वारकाजीत मंडले, यादव चांदेवार, सुनिता पटले, अर्चना पवार, मीना राऊत,हर्षा डोये, नगमा साखरे, निशिगंधा सोनवाने,अग्रवाल,रश्मी पवार,मोनिका हटवार,कोमल शेंडे, लीलाधर वळके,अनिल गायकवाड, गजेंद्र देशमुख, कैलास कोवे,तुषार कांबळे,विठ्ठल जुगनाके,सतीश बहेकार,उषाताई कोल्हे यांनी सहकार्य केले.