Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २८, २०२२

हत्तींचा कळप घुसला गावात; या गावातील नागरिक त्रस्त




सोमलपूर,गुढरी,सिरेगावबांध येथील उसवाड्या व धानाच्या पूजण्याची नासाडी.


संजीव बडोले, प्रतिनिधी.
नवेगावबांध:- दि.२८ नोव्हेंबर.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धानाच्या पुंजन्याची प्रचंड नुकसान करीत दाभना, अरततोंडी, इंजोरी पिंपळगाव,खांबी,बाकटी या गावातील शेतकऱ्यांच्या धानाच्या पुंजन्याची प्रचंड नुकसान करीत बाकटी जवळील बोरटोला गावालगतच्या भागी रिठी पहाडी जवळठाण मांडून बसलेल्या, हत्तीच्या कळपा गुढरी,सोमलपुर, सिरेरेगाव बांध या मार्गाने भंडारा वन विभागामध्ये प्रवेश केला आहे. आज दुपारच्या सुमारास शिवनीबांध जलाशयाच्या कडेने झाडगाव,नैनपुर,पापडा मार्गे महालगाव सुकळी परिसरात हत्तीच्या कळपाने आपले बस्तान मांडले आहे. गुढरी, सोमलपुर, सिरेगावबांध येथील शेतातील धानाच्या पुंजण्याची तसेेच ऊस वाड्यानची मोठी नुकसान केली आहे.


अर्जुनी मोरगाव तालुक्यातून हत्तींच्या कळपाने भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पीडित शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वावस टाकला आहे. परवा रात्रीच्या सुमारास अर्जुनीमोरगाव तालुक्यातील दाभणा, अरततोंडी,पिंपळगाव, खांबी, इंजोरी, बाकटी,चांना येथील शेतातील धनाच्या पूजण्याची नासधूस करीत हत्तीच्या कळपाने हैदोस मांडला होता. हत्तीचा कळप गोंदिया वन विभागातील नळेगाव बांध अर्जुनी मोरगाव वनक्षेत्रातून निघून गेल्यामुळे वनविभागाच्या अधिकारी कर्मचार्ऱ्यांनी देखील सुटकेचा निस्वास टाकला आहे.पुन्हा हत्तीचा कळप अर्जुनी मोरगाव तालुक्यात परत तर येणार नाही ना अशा प्रकारची धास्ती वनविभागात व शेतकऱ्यात आजही वाटत आहे. महालगाव स्थित असलेल्या हत्तींच्या कळप आता नागझिरा अभयारण्याकडे वळतो की, पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल होतो, याकडे वनविभागाचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.